जिंतुरातून दोन मुलासह महिला बेपत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:21 IST2021-08-26T04:21:08+5:302021-08-26T04:21:08+5:30
जिंतूर शहरातील मिस्कीन प्लॉट या भागात राहणाऱ्या वहिदा सलमान खान पठाण आणि त्यांचा मुलगा रेहान (१०) व मुलगी अलखिया ...

जिंतुरातून दोन मुलासह महिला बेपत्ता
जिंतूर शहरातील मिस्कीन प्लॉट या भागात राहणाऱ्या वहिदा सलमान खान पठाण आणि त्यांचा मुलगा रेहान (१०) व मुलगी अलखिया (८) अशा दोन मुलांसह ३ ऑगस्टपासून घरातून बेपत्ता झाली आहे. यासंदर्भात सलमान खान इस्राईल खान पठाण यांनी जिंतूर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार ३ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता वहिदा सलमान खान पठाण या कामावर जाते, असे सांगून दोन्ही मुलांसह घरातून निघून गेल्या. परंतु त्या घरी परत आल्या नाही. कामाच्या ठिकाणीही त्या मिळून आल्या नाही. सलमान खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून जिंतूर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद घेण्यात आली आहे. महिला आणि दोन्ही मुलांचा शोध पोलीस घेत आहेत. वहिदा सलमान खान पठाण यांनी पिवळ्या रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला असून, त्यांना मराठी व हिंदी भाषा बोलता येतात. त्यांच्यासोबत किराणा सामानाची पिशवी व एक लेडीज पर्स असल्याचे पोलिसांनी सांगितले.