शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

भाजपत प्रवेश करणार का? कॉँग्रेस आमदार सुरेश वरपुडकर यांनी स्पष्ट केली भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2024 15:10 IST

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासोबत कॉँग्रेसचे कोणते आमदार आहेत याची चर्चा सुरू आहे.

- सत्यशील धबडगेमानवत: काँग्रेसचे मराठवाड्यातील मातब्बर नेते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी कॉँग्रेसला रामराम करत आमदारकीचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आता चव्हाण यांच्यासोबत कॉँग्रेसचे कोणते आमदार आहेत याची चर्चा सुरू आहे. यातच पाथरी विधानसभा मतदारसंघाचे आ. सुरेश वरपुडकर हे चव्हाण समर्थक म्हणून परिचित आहेत. त्यामुळे वरपुडकर काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आ. वरपुडकर यांनी भाजपत जाणार नाही असे स्पष्ट केले आहे.

मानवत शहरात आज काही विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमाला आमदार सुरेश वरपूडकर, खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान, नगराध्यक्ष बालकिशन चांडक  उपस्थित होते. उद्घाटन कार्यक्रम सुरू असतानाच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे राजीनामा दिल्याचे वृत्त धडकले. तसेच आ. चव्हाण हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, चव्हाण यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे पाथरी मतदारसंघाचे आमदार सुरेश वरपुडकर हे काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष्य होते. 

आपण भाजपमध्ये प्रवेश करणार आहात का? असे विचारले असता आ. वरपुडकर यांनी स्पष्टपणे 'नाही' असे सांगितले. आमदार वरपुडकरांनी तूर्त तरी नाही असे उत्तर दिले असले तरी आगामी काळात ते काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसparabhaniपरभणीAshok Chavanअशोक चव्हाणBJPभाजपा