शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

तक्रार न केल्याने पावणे सात लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 18:41 IST

२०२०-२०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपयांचा विमा भरला.

ठळक मुद्देप्रधानमंत्री पीक विमा योजना३३ हजार शेतकऱ्यांच्या तक्रारी

परभणी : यावर्षीच्या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत आपली पिके संरक्षित केली.  स्थानिक आपत्ती अंतर्गत त्यापैकी केवळ ३३ हजार शेतकऱ्यांनीच कंपनीकडे पूर्व सूचना केली आहे. त्यामुळे उर्वरित पावणे सात लाख शेतकरी विमा कंपनीच्या मदतीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. 

२०२०-२०२१ या खरीप हंगामात जिल्ह्यातील ७ लाख १२९ शेतकऱ्यांनी ३ लाख ७६ हजार ८१ हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी, बाजरी, मूग, सोयाबीन, उडीद, तूर व कापूस या पिकांच्या संरक्षणापोटी ३२ कोटी ९० लाख १४ हजार ६२४ रुपयांचा विमा भरला. मात्र हाता-तोंडाशी आलेली पिके सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातून गेली. त्यामुळे आता शेतकरी पीक विमा मदतीकडे डोळे लावून आहेत. मात्र कंपनीकडून स्थानिक आपत्ती अंतर्गत प्राप्त पूर्व सूचना व काढणी पश्चात सूचना केलेल्या शेतकऱ्यांची संख्या केवळ ३३ हजार आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांनाच मदत मिळणार का? असा प्रश्न निर्माण झाला असून, उर्वरित पावणे सात लाख शेतकऱ्यांची धकधक वाढली आहे.

२१०२ शेतकरी अपात्रप्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत स्थानिक आपत्ती प्राप्त पूर्व सूचना व सर्वेक्षण अंतर्गत ३३ हजार शेतकऱ्यांनी कंपनीला आपल्या पिकांचे नुकसान कळविले होते. त्यामध्ये जवळपास १० हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण कंपनीने पूर्ण केले. त्यातही २ हजार १०२ शेतकरी मदतीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान होवूनही विमा कंपनी मदत देणार की नाही? याबाबत संभम्र आहे. 

७०० कोटींचे नुकसानयावर्षीच्या खरीप हंगामात सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे कापूस व सोयाबीन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकांवर केलेला खर्च वाया गेला. त्यामुळे जवळपास ७०० कोटी रुपयांचे नुकसान जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे झाले आहे. निश्चित करून देण्यात आलेल्या वेळेत नियमानुसार ज्या शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी पुराव्यासह दावा दाखल केला आहे, त्यांना विम्याची रक्कम मंजूर करण्यास अडचण येणार नाही; परंतु, ज्यांनी दावा दाखल केला नाही. त्यांना पीक विम्याची रक्कम देण्यासंदर्भातील धोरणात्मक निर्णय आहे. त्या संदर्भात निश्चित सांगता येणार नाही.-दीपक मुगळीकर, जिल्हाधिकारी

टॅग्स :Crop Insuranceपीक विमाparabhaniपरभणीagricultureशेती