शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
2
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
3
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
4
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
5
सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, १० ग्रॅम सोन्याची किंमत किती? चांदी महागली
6
IND vs WI: सर्फराज खानला विंडिजविरूद्ध कसोटी संघात का घेतलं नाही? अखेर BCCI ने दिलं उत्तर
7
'लडाखमध्ये जे घडत आहे ते चिंताजनक, प्रत्येक देशभक्ताने लोकांना पाठिंबा दिला पाहिजे'; अरविंद केजरीवाल यांनी स्पष्टच सांगितले
8
"पुन्हा NDA चे सरकार आल्यास नीतीश कुमार नव्हे तर...!"; ओवेसींनी सांगितलं, कोण होणार बिहारचा मुख्यमंत्री?
9
नवरात्र २०२५: ललिता सहस्रनामाचे नियमित करा पठण, देवी सदैव करेल पाठराखण; अपार लाभ-समृद्धी! 
10
ट्रम्पनी H-1B फीवरून ब्लॅकमेल केले, अमेरिकी कंपनीने भारतातच १२,००० नोकऱ्यांची घोषणा केली...
11
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
12
पुढच्या वर्षी ९४,००० पर्यंत जाणार Sensex; HSBC नं दृष्टीकोन बदलला, भारताचं रेटिंगही वाढवलं
13
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
14
बुद्धिबळाची 'राणी'! वडिलांची साथ, लेकीने रचला इतिहास; बिहारची पहिली महिला FIDE मास्टर
15
Tiger Attack: समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
16
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
17
Mumbai: नवरात्री दांडिया कार्यक्रमात राडा, जमावाकडून तरुणाला मारहाण, गोरेगाव येथील घटना!
18
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
19
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!

वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 13:07 IST

शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या नुकसानीची मुदत त्यांच्या खात्यावर मिळण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील.

- राजन मंगरुळकर

परभणी : पाथरी व गंगाखेड विधानसभा मतदारसंघात मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी अतिवृष्टीमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. नुकसानाची तीव्रता पाहता शेतकऱ्यांना वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू असे आश्वासन पाटील यांनी गुरुवारी केलेल्या पाहणी दरम्यान दिले.

पाहणी दौऱ्यात पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे येथे आमदार राजेश विटेकर, आमदार रत्नाकर गुट्टे, माजी आमदार विजय भांबळे व जिल्ह्यातील अधिकारी त्यांच्यासमवेत होते. यावेळी शेतकऱ्यांनी पिक विमा कंपनीचे बदललेले निकष आमच्यासाठी नुकसानदायक ठरत असल्याचे सांगून त्यात बदल करण्याची मागणी केली. तसेच वाढीव मदतीची मागणी ही केली.

याप्रसंगी मंत्री मकरंद पाटील म्हणाले, शेतकऱ्यांना खरिपाच्या पिकाचा मुख्य आधार असतो. मात्र, तेच हातचे गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव मदत मिळण्यासाठी येत्या कॅबिनेटसमोर प्रस्ताव मांडला जाईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या व्यथा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासमोर मांडून वाढीव मदतीची त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी काय करता येते ते करण्याचा प्रयत्न राहील. शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या निकषानुसार दिवाळीपूर्वी अतिवृष्टीच्या नुकसानीची मुदत त्यांच्या खात्यावर मिळण्यासाठी शासनाचे सर्वतोपरी प्रयत्न राहतील.

जमीन खरडणीमध्ये मुदतवाढीचा निर्णय घेणारमंत्री पाटील म्हणाले, जमीन खरडून गेल्याबाबत मिळणारी ४७ हजारांची रक्कम अपुरी असल्याने त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 

साडेआठ हजारात खताची बॅगही येईनाधानोरा काळे येथे शेतकऱ्यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना साडेआठ हजाराची मिळणारी मदत अपुरी असल्याचे सांगून त्यामध्ये कोल्हापूरच्या धरतीवर ३५ हजारापर्यंत वाढ करण्याची मागणी केली. काहीजणांनी घराची पडझड व दुकानात पाणी घुसल्याने झालेल्या मोठ्या आर्थिक नुकसानीचा प्रश्नही पाटील यांच्यासमोर मांडला. यावर पाटील यांनी या सर्व घरांच्या पडझडीचा पंचनामा प्रशासनाकडून झाल्यानंतर त्यांच्या स्तरावरच मदत देण्यात येत आहे. सध्या झालेल्या अतिवृष्टीच्या नुकसानीचे पंचनामे येत्या दोन दिवसात पूर ओसरल्यानंतर केले जातील. जेथे शक्य आहे तेथे पंचनामे सुरू करण्यात आल्याचेही मंत्र्यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Increased aid proposal before cabinet: Minister Makrand Patil's assurance.

Web Summary : Minister Makrand Patil assured increased aid for rain-affected farmers after surveying losses in Parbhani. He will present the proposal to the cabinet and address crop insurance issues, aiming for pre-Diwali relief as per NDRF norms. Damaged land compensation will also be increased.
टॅग्स :Rainपाऊसfloodपूरparabhaniपरभणी