आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; राज्यातच वाढली प्रवेश अर्जांची संख्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:18 IST2021-07-27T04:18:43+5:302021-07-27T04:18:43+5:30
परभणी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, राज्यस्तरावर दाखल झालेल्या अर्जांची संख्या लक्षात घेता, हव्या असलेल्या ट्रेडला ...

आयटीआयला प्रवेश मिळेल का रे भाऊ; राज्यातच वाढली प्रवेश अर्जांची संख्या
परभणी : औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची प्रवेशप्रक्रिया सुरू झाली असून, राज्यस्तरावर दाखल झालेल्या अर्जांची संख्या लक्षात घेता, हव्या असलेल्या ट्रेडला प्रवेश मिळतो की नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे.
जिल्ह्यात नऊ शासकीय आणि चार खासगी अशा १३ औद्योगिक प्रशिक्षण संस्था आहेत. या प्रशिक्षण संस्थांमध्ये दरवर्षी सर्वच ट्रेडला विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद मिळतो. यावर्षी राज्यस्तरावरून ऑनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जात आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात असून, आयटीआयसाठी प्रवेश मिळतो की नाही, अशी चिंता विद्यार्थ्यांना लागली आहे. जिल्ह्यात २ हजार २९८ जागा असून, सद्यस्थितीला सुमारे ३ हजार अर्ज प्राप्त झाले आहेत.
राज्यात ३४ हजार अर्ज
आयटीआयची प्रवेशप्रक्रिया सध्या ऑनलाइन पद्धतीने राबविली जात आहे. आतापर्यंत ७२ हजार २३ विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले असून, त्यापैकी ५७ हजार ६१९ विद्यार्थ्यांनी पूर्ण अर्ज भरला आहे. ५४ हजार २७५ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन फीस जमा केली आहे. तर ३४ हजार १२५ विद्यार्थ्यांनी ऑप्शन निवडले आहेत. त्यामुळे ऑप्शन निवडणारे विद्यार्थ्यांचे अर्ज अंतिम मानले जातात. त्यात त्या विद्यार्थ्याला कोणत्या जिल्ह्यातील आयटीआयला प्रवेश घ्यायचा, त्याचा ऑप्शन दिला जातो. त्यामुळे ऑप्शन निवडलेले अर्ज अंतिम मानले जातात.
जिल्ह्यात आयटीआयच्या इलेक्ट्रिशियन ट्रेडला विद्यार्थ्यांची पसंती असते.
या ट्रेडची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे.
त्यापाठोपाठ फिटर, वायरमन, मोटार मेकॅनिक आदी ट्रेडला विद्यार्थी पसंती देतात. दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या लक्षात घेता स्पर्धा वाढली आहे.
गतरवर्षी ५ टक्के जागा रिक्त
n जिल्ह्यात आयटीआयच्या विविध ट्रेडसाठी २ हजार २९८ जागा आहेत.
n त्यात शासकीय विद्यालयांत १ हजार ६३६ खाजगी संस्थांत ७०२ जागा आहेत.
n एकूण जागांपैकी ९५ टक्के जागा मागील वर्षी भरल्या होत्या.