शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

परभणीचा महापौर कोण? १३ जणांनी दाखल केले उमेदवारी अर्ज; ९ फेब्रुवारीला फैसला!

By राजन मगरुळकर | Updated: February 3, 2026 15:51 IST

पक्षीय बलाबल पाहता महापौरपदासाठी उद्धव सेनेने सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज दाखल करून मोठे आव्हान उभे केले आहे.

परभणी: परभणी महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी राजकीय हालचालींना वेग आला असून मंगळवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पार पडली. दुपारी तीन वाजेपर्यंत महापौर पदासाठी एकूण १३, तर उपमहापौर पदासाठी ७ अर्ज दाखल झाले आहेत. पक्षीय बलाबल पाहता महापौरपदासाठी उद्धव सेनेने सर्वाधिक ६ उमेदवारांचे अर्ज दाखल करून मोठे आव्हान उभे केले आहे.

पक्षांतर्गत चढाओढ आणि माघारीचे राजकारणमहापौर पदासाठी उद्धव सेनेकडून ६, भाजपकडून ४, काँग्रेसकडून २ आणि राष्ट्रवादीकडून १ अर्ज दाखल झाला आहे. विशेष म्हणजे, आज सर्वच पक्षांच्या उमेदवारांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात एकत्रितपणे अर्ज दाखल केले. मात्र, ही शांतता केवळ ९ फेब्रुवारीपर्यंतच राहण्याची शक्यता आहे. अर्ज जास्त आल्याने आता पक्षश्रेष्ठींना कोणाची माघार घ्यायची आणि कोणाचा 'राजकीय बळी' द्यायचा, यासाठी कसरत करावी लागणार आहे.

उपमहापौर पदासाठीही मोठी चुरसउपमहापौर पदासाठी ७ अर्ज आले असून यात काँग्रेसने ३ अर्ज दाखल करत या पदावर आपला हक्क सांगितला आहे. याशिवाय भाजप २, उद्धव सेना १ आणि राष्ट्रवादी १ असे अर्ज दाखल झाले आहेत. येत्या ९ फेब्रुवारीला महापालिकेची विशेष सभा बोलावण्यात आली असून, याच सभेत परभणीचा नवा कारभारी कोण, हे स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, माघारीच्या दिवशी होणाऱ्या राजकीय घडामोडींकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Mayor Race Heats Up: 13 Nominations Filed, Decision on February 9

Web Summary : Parbhani's mayoral election sees 13 nominations filed, with Uddhav Sena leading. Intense competition for Deputy Mayor too. Decision on February 9th. Political maneuvering expected before then.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६parabhaniपरभणी