शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

परभणीत भाजपचे नाराज पक्ष सोडत असताना शिंदेसेनेने दिला ५०-५० चा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 15:45 IST

भाजपच्याच काहींनी नाराजीमुळे दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे.

परभणी : महायुतीतील राष्ट्रवादी (अजित पवार) स्वबळ आजमावणार हे आधीच स्पष्ट होते. मात्र भाजप व शिंदेसेनेचेही सूर जुळतील, असे वाटत नाही. शिंदेसेनेचा ५०-५० चा जागावाटपाचा फॉर्म्युला भाजपला मान्य होणेच शक्य नाही. दुसरीकडे, भाजपच्याच काहींनी नाराजीमुळे दुसऱ्या पक्षाकडून उमेदवारासाठी फिल्डिंग लावणे सुरू केले आहे. खुद्द माजी मंत्री सुरेश वरपूडकर यांचा पुतण्याच नाराज झाल्याने त्यांना राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

परभणीत भाजपने सत्ता खेचून आणायचीच, असा चंग बांधल्याने मागच्या अनुभवी माजी आमदार सुरेश वरपूडकरांना पक्षात घेतले. मात्र त्यांच्या हातात पूर्ण कारभार दिला नाही. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांचेच वर्चस्व दिसत आहे. शिवाय महानगराध्यक्ष शिवाजी भरोसे यांनी प्रभागनिहाय इच्छुकांची चाचपणी करून आधीच जास्तीत जास्त प्रभागात उमेदवार कसे देता येतील, हे पाहिले. त्यानंतर पुन्हा काही नव्या इच्छुकांची भर पडली. त्यामुळे हिंदुबहुल प्रभागांमध्ये भाजपकडे असलेली गर्दी अडचणीची ठरू लागली. त्यात शिंदेसेनेने ५० टक्के जागांचा आग्रह धरला. त्यामुळे ही बोलणी फिसकटण्याचीच चिन्हे आहेत.

मागील काही दिवस नाराज दिसत असलेले प्रथम महापौर प्रताप देशमुख अखेर सक्रिय झाले आहेत. आमदार राजेश विटेकर यांच्यासमवेत बैठका घेऊन रणनीती आखताना दिसत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आता ताकद लावताना दिसत आहे.

आघाडीतही बिघाडीचेच संकेतकाँग्रेसनेही आधी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. पक्षांतरानंतरही उरलेल्या माजी नगरसेवकांना प्राधान्य दिले जात आहे. शिवाय आघाडीचे गणित जुळत नसल्याने या माजी नगरसेवकांनी आपल्यासोबत कुणाला घ्यायचे ते आधीच निश्चित केले. आता उद्धवसेनेशी युती करायची तर यांचे काय करायचे? हा प्रश्न आहे. उद्धवसेनेने जागावाटपाचा प्रस्तावही दिलेला नाही. जेथे ज्याचा सक्षम उमेदवार तेथे त्याला उमेदवारी हे सूत्र असावे, असे म्हटले जात आहे. मात्र या सक्षमतेचे निकष कोण ठरविणार?

भाजपमधील गर्दीने गोचीभाजपमध्ये जुन्या व नव्यांची सांगड घालणे अवघड जात आहे. माजी मंत्री सुरेश वरपूडकर हे भाजपमध्ये नंतर गेले. त्यांचे बंधू विजय वरपूडकर आधीच तेथे होते. मात्र भाजपकडून विजय वरपूडकर यांचा मुलगा टोनी यांचीच उमेदवारी निश्चित होत नसल्याने ते राष्ट्रवादीच्या संपर्कात दिसत आहेत. वरपूडकर समर्थक विश्वजित बुधवंत यांच्या प्रवेशानंतर तेथील एका जुन्या भाजप निष्ठावंताने थेट प्रदेशकडून उमेदवारीसाठी दबाव आणला. त्यामुळे ही उमेदवारीही पेचात आहे.

उद्धवसेनेचा युवा जिल्हाप्रमुख राष्ट्रवादीतउद्धवसेनेचे जागावाटप व आघाडीचे भिजत घोंगडे कायम असल्याने यात आपले काही खरे दिसत नसल्याचे पाहून उद्धवसेना युवा जिल्हाप्रमुख अर्जुन सामाले यांनी थेट राष्ट्रवादी (अजित पवार)च्या गोटात जाणे पसंत केले. तेथे यापूर्वीच्या सभागृहात राहिलेल्या अनुभवी चेहऱ्यांसोबत लढण्याची संधी घेण्याचा प्रयत्न आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani: BJP discord leads to defections, Shinde's Sena offers 50-50 deal.

Web Summary : Parbhani's political scene is turbulent. BJP faces internal strife and potential defections. Shinde's Sena proposes a 50-50 seat-sharing arrangement, unlikely to be accepted by BJP. Other parties also grapple with alliance issues and candidate selections, leading to shifts in allegiance.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक २०२६BJPभाजपाShiv Senaशिवसेना