माणसं जगतील, जनावरांचे काय ?

By Admin | Updated: November 5, 2014 13:50 IST2014-11-05T13:50:19+5:302014-11-05T13:50:19+5:30

खरीप हंगाम हातून गेला, रबीचीही स्थिती भयावह आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात हाती काहीच लागले नाही. पिकांवर केलेलाही खर्चही निघाला नसल्याने खिशात चणचण भासत असून, शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे.

What will the animals live for? | माणसं जगतील, जनावरांचे काय ?

माणसं जगतील, जनावरांचे काय ?

विलास चव्हाण ■ परभणी

 
खरीप हंगाम हातून गेला, रबीचीही स्थिती भयावह आहे. त्यामुळे दोन्ही हंगामात हाती काहीच लागले नाही. पिकांवर केलेलाही खर्चही निघाला नसल्याने खिशात चणचण भासत असून, शेतकरी आर्थिक विवंचनेत आहे. एका बाजूला ही परिस्थिती असताना दुसर्‍या बाजूला दुष्काळ आ वासून उभा आहे. जिल्ह्यातील धरणे, तलाव, बंधारे आणि नदी-नाले हिवाळ्यातच कोरडेठाक झाल्याने परिस्थिती गंभीर असून पाणी आणि चार्‍याचा प्रश्न बिकट आहे. अशाच स्थितीत आठ महिने नागरिकांना काढायचेत. अशा दुष्काळी स्थितीत माणसे जगतील, पण जनावरांच्या पाणी, चार्‍याचे काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
 
यावर्षी पावसाने पिकांचा खेळखंडोबा केला. आतापर्यंत जिल्हाभरात ३५७.७0मि. मी. एवढा पाऊस झाला आहे. परभणी जिल्ह्याची वार्षिक सरासरी ७७९ मि. मी. असून या सरासरीशी तुलना करता ४५ टक्के पाऊस या पावसाळयामध्ये झाला. जिल्ह्यात पाथरी तालुक्यात सर्वाधिक ४३५ मि. मी. तर पालम तालुक्यात सर्वात कमी २६६ मि.मी. पाऊस झाला आहे. अल्प पावसामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक गणित तर कोलमडले, शिवाय आगामी काळात पाणी, चाराटंचाई हे प्रश्न सतावणार आहेत. सध्या जिल्ह्यातील लघु आणि मध्यम प्रकल्पात केवळ २३टक्के पाणी आहे. १४ क्विंटलच कापूस
> गेल्या वर्षी बागायती तीन ते चार एकरमध्ये कापसाची लागवड केली होती. त्यामध्ये जवळपास १00क्विंटल कापूस झाला होता. यावर्षी मात्र पावसाने दगा दिल्यामुळे व लाल्याचा प्रादुर्भाव झाल्याने १२ते १४ क्विंटल कापूस होणार आहे. तसेच शेतामध्ये जनावरांचा चारा नसल्याने जनावरे जगवावीत कशी असा प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्यावर्षी लाखाचा माल झाला तर यावर्षी मात्र हजारामध्येच उत्पन्न झाल्याचे शेतकरी बाळासाहेब हरकळ यांनी सांगितले. एकरात फक्त ५0 किलो कापूस -लाडाजी वडकर 
> यंदा पाच ते सहा एकर कोरडवाहू शेतामध्ये कपाशीची लागवड केली होती. परंतु, पावसाविना या कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झाला. तसेच वाढ खुंटल्याने झाडाला एक ते दोन बोंडे लागली आहेत. त्यामुळे एकरी एका बॅगला ५0किलो कापूस होईल. एकरी ३0 ते ४0 हजार रुपये खर्च करुन शेतकर्‍यांना केवळ चार ते पाच हजार रुपये मिळत आहेत, असे पेडगाव येथील शेतकरी लाडाजी वडकर यांनी सांगितले.
ज्वारी उगवलीच नाही
> यंदाच्या रबी हंगामात अल्पशा ओलीवर तीन एकरात रबी ज्वारीची पेरणी केली. ज्वारी उगवलीच नाही. आता जनावरे आठवडी बाजारात विक्री केल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, अशी प्रतिक्रिया हसनापूर येथील शेतकरी कुंडलिक खरडे यांनी दिली. जिल्ह्यात ७ लाख ८0 हजार जनावरे
> जिल्ह्यामध्ये मोठी जनावरे (गाय, बैल, म्हैस) ४लाख १४ हजार २७, लहान जनावरे १लाख २६ हजार ९0६ व शेळ्या-मेंढय़ा २लाख ३८ हजार ९00 असे एकूण ७लाख ८0 हजार १३३जनावरे आहेत. या जनावरांना २0 ते २५ दिवस पुरेल एवढाच चारा उपलब्ध आहे. तब्बल ८ते ९महिने ही जनावरे चार्‍याविना जगविणे शेतकर्‍यांना अवघड होणार आहे. प्रशासनाच्या वतीने मात्र या जनावरांसाठी छावण्या उभा करण्यासाठी कोणतीही हालचाल केली जात नसल्याचे दिसून येते. त्यामुळे शेतकरी आठवडी बाजारामध्ये कवडीमोल भावाने जनावरांची विक्री करीत आहेत. गारपिटीचे अनुदान बाकीच
> जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी व मार्च महिन्यात अतवृष्टी व गारपीट झाली होती. त्यामध्ये रबी हंगामातील गहू, हरभरा, टरबूज आदी पिकांचे नुकसान झाले होते. शासनाच्या वतीने मदत म्हणून हेक्टरी नुकसान भरपाई जाहीर केली होती. परंतु, जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांना या नुकसानीची भरपाई अद्यापही मिळालेली नाही. परिणामी शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत लोटला गेला. कोट्यवधींचा पीकविमा 
> जिल्ह्यातील शेतकर्‍यांनी खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, तूर, मूग आदी पिकांचा विमा उतरविला. परंतु, या नुकसानीची भरपाई शेतकर्‍यांना अद्यापही मिळालेली नाही. प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची हालचाल केली गेली नाही. तसेच रबी हंगामातील लाखो हेक्टरवरील जमीन पडीक पडली आहे. शासनाने दुष्काळ जाहीर करुन शेतकर्‍यांना तत्काळ आर्थिक मदत केल्यास शेतकर्‍यांच्या आत्महत्या थांबतील. सतत दोन - तीन वषार्ंपासून जिल्ह्यात अतवृष्टी, गारपीट व कोरडा दुष्काळ पडत आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी जीवन जगण्यासाठी संघर्ष करीत आहे. यंदाच्या वर्षीही खरीप हंगामात अल्पसा पाऊस झाल्याने हजारो हेक्टरवरील सोयाबीनचे पीक पाण्यावाचून जळून गेले. तसेच कोरडवाहू क्षेत्रातील कापसाला पावसाचे पाणी न मिळाल्याने लाखो हेक्टरवरील कापसावर लाल्याचा प्रादुर्भाव झाला. परिणामी उत्पादन घटले. त्यानंतर परतीच्या पावसाने हजेरी न लावल्याने रबी हंगामातील जिल्ह्यातील ३लाख १८ हजार २९0 हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १३ टक्केच पेरणी झाली आहे. त्यामध्ये शेतकर्‍यांनी कमी पाण्यावर येणार्‍या रबी ज्वारीची अल्पश: ओलीवर पेरणी केली होती. परंतु,् ही ज्वारी उगवलीच नाही. त्यामुळे भविष्यामध्ये आठ महिने शेतकर्‍यांकडे असलेली दुभती जनावरे कशी जगवायची, असा गहन प्रश्न शेतकर्‍यांसमोर निर्माण झाला आहे. तसेच खरीप हंगामातील सोयाबीनच्या एका बॅगला दोन पोत्याचा उतारा आल्याने शेतकर्‍यांना घरातूनच पैसे घालून शेती करावी लागली आहे. तसेच जिल्ह्यातील रबी हंगामातील तब्बल दोन ते अडीच लाख हेक्टरवरील शेत जमीन पेर्‍याविना पडीक राहिली आहे. अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकरी आपले जीवन जगत आहे. परंतु, निर्ढावलेल्या शासकीय अधिकार्‍यांना याचे गांभीर्य वाटेनासे झाले आहे. जिल्ह्यामध्ये गेल्या दोन ते चार महिन्यांत ८ ते १0 शेतकर्‍यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपविली. एवढे घडत असूनही शासनाच्या वतीने शेतकर्‍यांना कोणतीही आर्थिक मदत जाहीर केली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांना आपले कुटुंब, मुलांचे शिक्षण व दैनंदिन गरजा कशा भागवाव्यात, असा प्रश्न पडला आहे. 

Web Title: What will the animals live for?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.