दंतमहाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:16 IST2021-02-07T04:16:29+5:302021-02-07T04:16:29+5:30
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव तथा मनपा सदस्या ...

दंतमहाविद्यालयात विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ
यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रफुल्ल पाटील यांची तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव तथा मनपा सदस्या डॉ. विद्याताई प्रफुल्ल पाटील, अधिष्ठाता डॉ. मंगला राकारड्डी, प्रा.डॉ. नम्रता पाटील, प्रा.डॉ. अर्चना जटानिया, प्रा.डॉ. विनिता मुरगूड, डॉ. रेणू पांडे, डॉ. अपूर्व सोनी यांची उपस्थिती होती. यावेळी पुणे, मुंबई, औरंगाबाद, नागपूर, कोल्हापूर व सोलापूर आदी शहरांमधून आलेले व बीडीएस प्रथम वर्षात प्रवेश घेतलेले १०० विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना डॉ. प्रफुल्ल पाटील म्हणाले की, परभणीचे
दंतमहाविद्यालय महाराष्ट्रातल्या निवडक नॅक मूल्यांकित महाविद्यालयांपैकी एक असल्याने येथील शिक्षणाचा दर्जा व
गुणवत्ता पाहता महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांनी परभणीस प्राधान्य दिल्याने प्रवेशित विद्यार्थ्यांच्या संख्येवरून दिसून येत आहे. यावेळी सरस्वती धन्वंतरी दंतमहाविद्यालयातील अंतिम वर्षाची विशेष प्रावीण्याने विद्यापीठात उत्तीर्ण झालेली विद्यार्थिनी डॉ. हबीबा काझी हिच्या हस्ते प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांचे
स्वागत करण्यात आले. यावेळी कोरोनाच्या अनुषंगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करण्यात आले.