घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:15 IST2021-04-14T04:15:59+5:302021-04-14T04:15:59+5:30
पंचांगाचे पूजन पाडव्यापासून हिंदू धर्मातील नवीन वर्षाला सुरुवात होते. त्यानुसार या दिवशी पंचांगांचे पूजन घरोघरी केले जाते. बाजारपेठेतील पुस्तकाच्या ...

घरोघरी गुढी उभारून नववर्षाचे स्वागत
पंचांगाचे पूजन
पाडव्यापासून हिंदू धर्मातील नवीन वर्षाला सुरुवात होते. त्यानुसार या दिवशी पंचांगांचे पूजन घरोघरी केले जाते. बाजारपेठेतील पुस्तकाच्या दुकानांसह काही धार्मिक ठिकाणी पंचांगाची खरेदी मागील काही दिवसात करण्यात आली. यंदा दाते पंचांगाची किंमत ७० रुपये इतकी होती.
दरवाजाला आब्यांच्या पानांचे तोरण
प्रत्येक घरी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी घराच्या मुख्य दरवाजासह नवीन वस्तू, वाहन आणि देवालयात आंब्याच्या पानांचे तोरण लावण्याची परंपरा आहे. ती याही वर्षी कायम दिसून आली. आंब्याच्या पानांचे तोरण आणि पिसोळ्यासह मध, कडूलिंब यांचा बनवलेला काढासुध्दा घरोघरी सेवन करण्यात आला.
नवीन वस्तूंच्या खरेदीकडे अनेकांची पाठ
यंदाचे लाॅकडाऊन होते. त्यात वाढलेली रुग्णसंख्या आणि बाजारपेठेसह सर्वत्र असलेली आर्थिक मंदी याचा परिणाम नवीन वर्षाच्या प्रारंभी पाडव्याला करावयाच्या खरेदीवर झाल्याचे दिसून आले. काही प्रमाणात खरेदी झाली तरी अनेकांनी नवीन वर्षाला खरेदी करणे टाळल्याचे दिसून आले.