सेलूत पुन्हा तीन दिवसांआड होणार पाणी पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2020 04:30 IST2020-12-03T04:30:33+5:302020-12-03T04:30:33+5:30
शहराला निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्यात दुधना प्रकल्प मृतसाठ्यात गेल्यानंतर पालिकेने कसरत करत शहराला सुरळीत ...

सेलूत पुन्हा तीन दिवसांआड होणार पाणी पुरवठा
शहराला निम्न दुधना प्रकल्पाच्या जलाशयातून पाणी पुरवठा केला जातो. उन्हाळ्यात दुधना प्रकल्प मृतसाठ्यात गेल्यानंतर पालिकेने कसरत करत शहराला सुरळीत तीन दिवसांआड एक तास पाणी पुरवठा केला होता. यंदा दुधना प्रकल्प शंभर टक्के भरल्याने पालिकेच्या प्रकल्पाच्या जवळील पंप हाऊस आणि सर्व १५ इंटक वेल पाण्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे ६ नोव्हेंबरपासून नगरपालिकेने तीन दिवसाआड सोडण्यात येणारे पाणी दोन दिवसाआड सोडण्याचा निर्णय घेतला होता; परंतु, नगरपालिकेने यासंदर्भात सूचना देऊनही काही भागात पाणी भरल्यानंतरही नागरिक रस्त्यावर पाणी सोडत आहेत. तसेच अनेक ठिकाणी नळाला तोट्या बसवल्या नसल्याने पाण्याचा अपव्यय होत असल्याचे निदर्शनास येत आहे. पाण्याचा अपव्यय वाढत असल्याने सूज्ञ नागरिकांनी तीन दिवसाआड पाणी पुरवठा करावा, अशी सूचना नगरपालिकेला केली आहे. त्यानंतर नगरपालिकेने शहराला पुन्हा तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनी दिली आहे.