पुलावर साचणारे पाणी ठरतेय त्रासदायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:14 IST2021-06-20T04:14:05+5:302021-06-20T04:14:05+5:30
गंगाखेड ते परभणी महामार्गावर तालुक्यातील खळी गाव परिसरात खळी पाटीजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावर झालेले खोलगट खड्डे बुजविण्यात आले ...

पुलावर साचणारे पाणी ठरतेय त्रासदायक
गंगाखेड ते परभणी महामार्गावर तालुक्यातील खळी गाव परिसरात खळी पाटीजवळ असलेल्या गोदावरी नदीच्या पुलावर झालेले खोलगट खड्डे बुजविण्यात आले नाहीत. तसेच पुलावर पडणाऱ्या पाण्याला जाण्यासाठी मोकळा मार्ग नसल्यामुळे पुलावरील खोलगट खड्ड्यात अंदाजे दीड ते दोन फूट पावसाचे पाणी साचत आहे. पाणी साचल्यामुळे पुलावर असलेल्या खड्ड्याचा अंदाज येत नसल्याने पाण्यातील खड्ड्यात दुचाकी आदळून अपघाताच्या घटना घडत आहेत. गोदावरी नदी पुलावर साचणारे पाणी दुचाकी चालकांसाठी जीवघेणे ठरत असून हे पाणी भविष्यात निजामकालीन पुलाला ही धोकादायक ठरणार असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. पाऊस येताच गोदावरी नदीच्या पुलावर साचणाऱ्या पाण्यापासून कुठलीही अनुचित घटना घडण्यापूर्वी येथे साचणाऱ्या पाण्याला मोकळी वाट करून देत पुलावर पडलेले खोलगट खड्डे बुजवावे, अशी मागणी दुचाकी चालकांसह अन्य वाहनधारकांतून होत आहे.