रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:17 IST2021-05-12T04:17:48+5:302021-05-12T04:17:48+5:30
उघडा महादेव मंदिर ते कारेगाव हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात ...

रस्ता दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा
उघडा महादेव मंदिर ते कारेगाव हा रस्ता मागील अनेक वर्षांपासून खराब झाला आहे. रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून, पावसाळ्यात या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेकवेळा अपघात होत आहेत. चारचाकी वाहने खड्ड्यात अडकून पडण्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. रस्त्यावरील जीवघेणे खड्डे बुजवावेत, अशी मागणी नागरिकांनी वेळोवेळी केली. मात्र अद्यापपर्यंत साधे खड्डेही बुजविले नाहीत. १५ मे पर्यंत या रस्त्यावरील किमान मोठा खड्डा मुरुम टाकून बुजवावा अन्यथा १७ मे रोजी सकाळी १० वाजता आंदोलन केले जाईल, असा इशारा ॲड. लक्ष्मण काळे, अविनाश पवार, प्रकाश कंठाळे, मंगेश साखरे, अशोक बोचरे, राजेश फुलपगार, सुधाकर बागडे, एम. के. सोनटक्के, सुरेश बाबर, राम लाटणे, विश्वनाथ इंगोले, विशाल गायकवाड आदींनी दिला आहे.