आजपासून शहरात प्रभागनिहाय लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:23 IST2021-09-08T04:23:34+5:302021-09-08T04:23:34+5:30
परभणी : आजपासून शहरात प्रभागनिहाय लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक दिवस - एक प्रभाग’ या उपक्रमाअंतर्गत बुधवारी ...

आजपासून शहरात प्रभागनिहाय लसीकरण
परभणी : आजपासून शहरात प्रभागनिहाय लसीकरण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ‘एक दिवस - एक प्रभाग’ या उपक्रमाअंतर्गत बुधवारी प्रभाग क्र. १ मध्ये लसीकरण शिबिर होणार असल्याची माहिती आयुक्त देवीदास पवार यांनी दिली.
परभणी शहरामध्ये लसीकरणाला गती येत नसल्याने जिल्हाधिकारी आंचल गोयल यांच्या आदेशावरून महापालिकेने पथके स्थापन करीत ‘एक दिवस - एक प्रभाग’ ही मोहीम सुरू केली आहे. बुधवारी प्रभाग क्रमांक १ मध्ये सरस्वती विद्यालय पाथरी रोड, वीज मंडळ विश्रामगृह जिंतूर रोड, कार्यकारी अभियंता कक्ष जिंतूर रोड, विद्युत मंडळ जिंतूर रोड, प्रभावती हायस्कूल येथे ७ केंद्रे, सा. बां. मंडळ अधीक्षक अभियंता क्षेत्रीय कार्यालय, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता यांचे कक्ष, जिल्हा प्रयोग शाळा इमारत, सा. बां. विभाग, विद्युत निरीक्षक कार्यालय, सा. बां. विभाग येथे हे लसीकरण होणार आहे. लसीकरणासाठी विभाग प्रमुख, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नागरिकांनी या लसीकरण मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयुक्त देवीदास पवार यांनी केले आहे.