मनपा सभापतींनाच नको प्रभाग समिती

By Admin | Updated: November 11, 2014 15:44 IST2014-11-11T15:44:53+5:302014-11-11T15:44:53+5:30

महानगरपालिकेच्या प्रभाग समितीला कुठलेही अधिकार नसल्याने या प्रभाग समिती सभापतींनीच या प्रभाग समिती बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.

The ward committee does not want the NMC chairman | मनपा सभापतींनाच नको प्रभाग समिती

मनपा सभापतींनाच नको प्रभाग समिती

>परभणी: महानगरपालिकेच्या प्रभाग समितीला कुठलेही अधिकार नसल्याने या प्रभाग समिती सभापतींनीच या प्रभाग समिती बंद करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे.
प्रभाग समिती ब च्या सभापती रुखसाना बेगम रौफ खान आणि अ च्या सभापती आशाबाई नर्सीकर यांनी सोमवारी आयुक्तांकडे ही मागणी केली आहे. स्वच्छता, घंटागाडी, डिझेल, खाजगी वाहन चालक, लेबरचे नियोजन मुख्य कार्यालयातून केले जाते. वाहने बंद असली तरी परस्पर मुख्य कार्यालयातून हजेरी पाठविली जाते. कामगार केव्हा कामासाठी घेतले जातात, कधी बंद होतात, याची माहितीही समितीला नसते. पथदिवे बसविण्यासाठी कामगार नाहीत, लिकेज दुरुस्तीसाठी एजन्सी कोठे काम करीत आहे, याची माहितीही समितीला नाही. त्यामुळे तुटपुंजे अधिकार असलेल्या या प्रभाग समित्या रद्द कराव्यात, अशी मागणी या सभापतींनी केली आहे. कामामध्ये सुसूत्रता यावी व नागरिकांना वेळेत सुविधा मिळाव्यात या हेतूने प्रभाग समितीची स्थापना झाली आहे, हे विशेष. (/प्रतिनिधी)

Web Title: The ward committee does not want the NMC chairman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.