सोनपेठला शासकीय विश्राम ग्रहाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:29 IST2021-02-06T04:29:42+5:302021-02-06T04:29:42+5:30

राष्ट्रीयकृत बँकेसाठी नागरिक त्रस्त सोनपेठः तालुक्यात एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यात विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक व्यापारी ...

Waiting for the official resting place at Sonpeth | सोनपेठला शासकीय विश्राम ग्रहाची प्रतीक्षा

सोनपेठला शासकीय विश्राम ग्रहाची प्रतीक्षा

राष्ट्रीयकृत बँकेसाठी नागरिक त्रस्त

सोनपेठः तालुक्यात एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. तालुक्यात विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक व्यापारी यांची संख्या मोठ्या प्रमाणात असून यासाठी तालुक्यात केवळ एकच राष्ट्रीयकृत बँक असल्याने नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सोनपेठ शहरात नवीन राष्ट्रीयकृत बँकेची मागणी नागरिकांकडून होत आहे.

लांब पल्ल्याच्या बस चालू करण्याची मागणी

सोनपेठः तालुक्यातुन औरंगाबाद,नांदेड, पंढरपूर, हिंगोली, बीड, जालना यासह मोठ्या शहरामध्ये जाण्यासाठी बसेस नाहीत त्यामुळे सोनपेठ येथून लांब पल्ल्याच्या बसेस चालू करण्याची मागणी प्रवाशाकडून होत आहे.

पाथरी परळी रस्ता नादुरूस्त

सोनपेठः शहरातून जाणारा पाथरी सोनपेठ परळी या मार्गावरील तहसील कार्यालयापासून गावळी पिंपरी पाटीपर्यंत रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमधून वाहन चालवताना वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. सदरील रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे.

Web Title: Waiting for the official resting place at Sonpeth