होलोग्रामअभावी रखडले मतदार ओळखपत्र वाटप

By Admin | Updated: February 13, 2015 15:28 IST2015-02-13T15:28:09+5:302015-02-13T15:28:09+5:30

मतदान ओळखपत्रासाठी आवश्यक असलेले होलोग्राम उपलब्ध न झाल्याने नव्याने मतदार यादीत समाविष्ट झालेल्या मतदारांना अजूनही मतदान ओळखपत्र वाटप झाले नाहीत.

Voter Identity Card allocated due to hologram allocation | होलोग्रामअभावी रखडले मतदार ओळखपत्र वाटप

होलोग्रामअभावी रखडले मतदार ओळखपत्र वाटप

परभणी : मतदान ओळखपत्रासाठी आवश्यक असलेले होलोग्राम उपलब्ध न झाल्याने नव्याने मतदार यादीत समाविष्ट झालेल्या मतदारांना अजूनही मतदान ओळखपत्र वाटप झाले नाहीत. त्यामुळे ओळखपत्रासाठी मतदार तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत.
परभणी जिल्ह्यात १ ते १६ डिसेंबर या काळात मतदार पुनरिक्षण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत घरोघर जाऊन मतदार यादीत समाविष्ट नसलेल्या तसेच नव मतदारांची नोंदणी करण्यात आली. त्याचप्रमाणे ७ व १४ जानेवारी रोजी विशेष कॅम्प घेऊन मतदार नोंदणी करण्यात आली. तसेच ज्या मतदारांचे फोटो यादीत समाविष्ट नव्हते, अशा मतदारांचे फोटो उपलब्ध करण्यात आले. 
नव्याने समाविष्ट झालेल्या मतदारांची यादी २१ जानेवारी रोजी प्रसिद्ध करण्यात आली. २५ जानेवारी रोजी जिल्हाभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. या दिवशी नव्याने नोंदणी झालेल्या मतदारांना मतदान ओळखपत्र वितरित करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने दिले. प्रातिनिधीक स्वरुपात निवडक मतदारांचे ओळखपत्र कार्यक्रमात वाटप करण्यात आले. परंतु उर्वरित मतदारांना अद्यापपर्यंत ओळखपत्र प्राप्त झाले नाहीत.
ओळखपत्र बनविण्यासाठी प्लास्टीकचे पाऊच आणि शासनाच्या होलोग्रामची आवश्यकता असते. परंतु निवडणूक विभागाकडून होलोग्राम उपलब्ध झाले नसल्याने अजूनही ओळखपत्र तयार झाले नाहीत. परिणामी नवीन मतदार ओळखपत्रांसाठी तहसील कार्यालयात चकरा मारत आहेत. परभणीसह अन्य विधानसभा मतदार संघातही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे./(प्रतिनिधी)

होलोग्रामची केली मागणी
या संदर्भात तहसील कार्यालयाशी संपर्क साधला असता, होलोग्राम नसल्याने ओळखपत्र तयार करता आले नाहीत. शिक्के मारुन मतदार कार्ड तयार करुन ठेवले आहेत. निवडणूक विभागाकडे होलोग्रामची मागणी केली असून, ते उपलब्ध झाल्यास मतदारांना मतदान ओळखपत्र वाटप होतील, असे सांगण्यात आले.

 ■ परभणी विधानसभा मतदार संघात मतदार पुनरिक्षण कार्यक्रमात १३ हजार मतदारांची नोंदणी झाली आहे. या मतदार संघात ८ हजार ६४९ नवीन मतदारांची नोंदणी झाली तर नावातील दुरुस्ती असलेले ४ हजार ५१४ मतदार आहेत. ४0८ मतदार एका भागातून दुसर्‍या भागात स्थलांतरित झालेले आहे. या सर्व मतदारांना नव्याने ओळखपत्र वितरित करावयाचे आहेत. 

Web Title: Voter Identity Card allocated due to hologram allocation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.