कोद्री आरोग्य केंद्रातील सुविधांना विटेकरांनी घेतला आढावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:15 IST2021-06-02T04:15:05+5:302021-06-02T04:15:05+5:30
कोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रात जिल्हा परिषदेचे सदस्य भगवानराव सानप यांनी केली ...

कोद्री आरोग्य केंद्रातील सुविधांना विटेकरांनी घेतला आढावा
कोद्री येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रात जिल्हा परिषदेचे सदस्य भगवानराव सानप यांनी केली होती. या आरोग्य केंद्रातील अनियमिततेचा त्यांनी काही दिवसापूर्वी कारभार चव्हाट्यावर आणला होता. या पार्श्वभूमीवर माजी जि.प. अध्यक्ष राजेश विटेकर यांनी मंगळवारी या आरोग्य केंद्रास भेट देऊन येथील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. यावेळी जि.प. सदस्य भगवान सानप यांनी येथील वैद्यकीय अधिकारी डॉ विद्यासागर लटपटे यांच्या कारभाराविषयी विटेकर यांच्याकडे तक्रार केली. तसेच येथील समस्या सोडवून जनतेला चांगली आरोग्य सेवा देण्याची विनंती केली. यावेळी विटेकर यांनी जि.प. सीईओ शिवानंद टाकसाळे यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून येथील आरोग्य केंद्राकडे वैयक्तिक लक्ष देऊन येथील समस्या सोडविण्याची विनंती केली. त्यावर टाकसाळे यांनी लवकरच आपण स्वत: कोद्रीला भेट देऊन येथील समस्यांचा आढावा घेऊ. तसेच येथील समस्या मार्गी लागण्याचे आश्वासन दिले. यावेळी जि.प. सदस्य भगवान सानप यांच्या प्रयत्नातून जि.प. स्थानिक निधीमधून रुग्णांच्या नातेवाईकांसाठी उभारण्यात आलेली धर्मशाळा, पीएम रूम, आरोग्य केंद्र परिसरातील सिमेंट रस्त्याच्या कामाचे लोकर्पण व उद्घाटन विटेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी विटेकर यांचा कोद्री ग्रा.पं.च्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी मोहनराव लटपटे,वैजनाथराव लटपटे, कार्तिक फड, बालाजी लटपटे, वैजनाथ माळकरी, साहेब पहिलवान, कोंडीराम पाटील, ॲड भागवत मुंडे, निळोबा मुंडे, अर्जुन लटपटे, संतोष लटपटे, विनायक सावंत, पप्पू सावंत, कैलास लटपटे, गोपाळ फड, आकाश मुंडे, धीरज मुंडे, महादेव बिडगर, महादेव टिकनर आदींची उपस्थिती होती.