केंद्राच्या पथकाने ग्रामीण भागात दिल्या भेटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:17 IST2021-04-11T04:17:35+5:302021-04-11T04:17:35+5:30

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने उपाययोजना करीत आहे, याची पाहणी करण्यासाठी केंद्र ...

Visits by the Centre's team to rural areas | केंद्राच्या पथकाने ग्रामीण भागात दिल्या भेटी

केंद्राच्या पथकाने ग्रामीण भागात दिल्या भेटी

जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग वाढला असल्याने त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य यंत्रणा कशा पद्धतीने उपाययोजना करीत आहे, याची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाने एक पथक नियुक्त केले आहे. डॉ. रंजना सोळंकी आणि डॉ. दिनेश बाबू एस हे दोन अधिकारी दोन दिवसांपासून जिल्ह्यात कोरोनाचा आढावा घेत आहेत.

डॉ. सोळंकी आणि डॉ. दिनेश बाबू यांनी शनिवारी परभणी तालुक्यातील पिंगळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. या ठिकाणी लसीकरण कार्यक्रमाची माहिती घेतली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती अंजलीताई आणेराव यांनी अधिकाऱ्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवानंद टाकसाळे, उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एस.पी. देशमुख, तहसीलदार संजय बिरादार, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. रावजी सोनवणे, डॉ मोबिन, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आनेराव, रवींद्र पतंगे आदींची उपस्थिती होती. तसेच या पथकाने पूर्णा तालुक्यातील रुपला, पूर्णा येथील कोरोना केअर सेंटर, एरंडेश्वर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. रुग्ण, ग्रामस्थ आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी ही पथकातील अधिकाऱ्यांनी संवाद साधला. आशा सेविकांनी वर्षभरात कोरोनासाठी केलेल्या कामगिरीचे कौतुक ही अधिकाऱ्याने केले. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणेने केलेल्या कामावर समाधान व्यक्त केले.

Web Title: Visits by the Centre's team to rural areas