शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

मतदान केल्याचा व्हिडिओ व्हायरल; परभणीत एकाविरुद्ध गुन्हा

By मारोती जुंबडे | Updated: November 20, 2024 16:10 IST

मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्याचे निदर्शनास आल्यानंतर गुन्हा दाखल

परभणी: मतदान केलेला व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना बुधवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी नानलपेठ पोलिसात एका विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परभणी विधानसभा मतदारसंघासाठी ३३८ केंद्रांवर मतदान होत आहे. मतदानासाठी सकाळपासून नागरिकांनी गर्दी केली आहे. परभणी शहरातील शारदा महाविद्यालयाच्या खोली क्रमांक १ मध्ये शेख सुलेमान याने स्वतःचे मतदान करताना बॅलेट युनिट वरील अनुक्रमांक १४ वरील निवडणूक निशाणीवर बटन दाबून मत टाकले. तसा फोटो त्याच्या मोबाईलवर घेऊन स्वतः सोशल मीडियावरून व्हायरल केला. शेख सुलेमान याने मतदान प्रक्रियेच्या गोपनियतेचा भंग केल्याचे निदर्शनास आल्याचे प्रवीण देवसेटवार यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कलम २२३ भारतीय न्याय संहिता २०२३ सह कलम १२८ कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवकर हे करीत आहेत.

सहा तासात जिल्ह्यात ३३.१२ टक्के मतदानविधानसभा निवडणूकीसाठी बुधवारी सकाळी ७ वाजता मतदानाला सुरुवात झाली. जिल्ह्यात सकाळी ७ ते १ वाजेदरम्यान सरासरी ३३.१२ टक्के मतदान झाले असल्याची जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी माहिती दिली. जिल्हा प्रशासनाकडून सकाळी ७ ते १ या सहा तासात झालेल्या मतदानाची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये जिंतूर विधानसभा मतदारसंघात दुपारी १ वाजेपर्यंत ३१.६४ टक्के, परभणी २७.६६, गंगाखेड ३७.६५ तर पाथरी विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक ३४.६१ टक्के मतदान झाले आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकparbhani-acपरभणी