रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2017 00:29 IST2017-11-23T00:28:53+5:302017-11-23T00:29:01+5:30

रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने दुचाकीवरील एका ४० वर्षीय महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील खळी परिसरात घडली.

The victim of the woman took the pothole on the road | रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

रस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला महिलेचा बळी

लोकमत न्यूज नेटवर्क
गंगाखेड : रस्त्यावर पडलेल्या खड्यांमध्ये दुचाकी आदळल्याने दुचाकीवरील एका ४० वर्षीय महिलेचा खाली पडून मृत्यू झाल्याची घटना २१ नोव्हेंबर रोजी तालुक्यातील खळी परिसरात घडली.
मानवत तालुक्यातील जंगमवाडी येथील सुधाबाई अच्युतराव शेळके (वय ४०) या त्यांच्या पती समवेत १९ नोव्हेंबर रोजी गंगाखेड तालुक्यातील खळी येथे माहेरी दुचाकीवरून जात होत्या.
यावेळी खळी शिवारात दुचाकी आली असता रस्त्यावरील पडलेल्या खड्यांमध्ये दुचाकी आदळली. त्यामुळे पाठीमागे बसलेल्या सुधाबाई शेळके या खाली पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला. अपघाताची माहिती मिळताच त्यांचा भाऊ अशोक रंगनाथ सूर्यवंशी व ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले.
त्यानंतर उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून परभणी येथे दाखल करण्यात आले. परंतु, प्रकृती अधिक बिघडल्याने नांदेड येथे हलविण्यात आले. परंतु, २१ नोव्हेंबर रोजी रात्री ८.३० वाजता उपचारा दरम्यान सुधाबाई शेळके यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: The victim of the woman took the pothole on the road