परभणीत खड्ड्याने घेतला विद्यार्थ्याचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2017 00:49 IST2017-12-05T00:48:53+5:302017-12-05T00:49:54+5:30
आॅटोरिक्षातून शाळेत जाणाºया एका विद्यार्थ्याचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. मुमताजनगरातील अय्यान खान सिराज खान हा ११ वर्षांचा विद्यार्थी सोमवारी आॅटोरिक्षातून शाळेत जात होता. भिकुलाल पेट्रोलपंपाजवळ असलेल्या मोईदुल मुस्लीमीन उर्दू शाळेत तो सहावी वर्गात शिकत होता.

परभणीत खड्ड्याने घेतला विद्यार्थ्याचा बळी
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : आॅटोरिक्षातून शाळेत जाणाºया एका विद्यार्थ्याचा खड्ड्यामुळे मृत्यू झाल्याची घटना ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली.
मुमताजनगरातील अय्यान खान सिराज खान हा ११ वर्षांचा विद्यार्थी सोमवारी आॅटोरिक्षातून शाळेत जात होता. भिकुलाल पेट्रोलपंपाजवळ असलेल्या मोईदुल मुस्लीमीन उर्दू शाळेत तो सहावी वर्गात शिकत होता. विद्यार्थ्यांना घेऊन येणारा हा आॅटो शाळेकडे येत असताना झाकीर हुसेन महाविद्यालयाजवळील एका चढावर रस्त्यात खड्डा लागला. त्यामुळे आॅटोरिक्षा आदळला व अय्यान खान याचे दफ्तर आॅटोतून खाली पडले. हे दफ्तर उचलून घेत असताना अय्यान खान हा आॅटोतून खाली पडला. त्याच्या डोक्याला जबर मार लागला व यातच त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी पोलीस दफ्तरी मात्र कोणतीही नोंद झाली नाही. घटनेची माहिती समजल्यानंतर महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून अय्यान खान सिराज खान यास श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.