शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वरपूडकर, तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:18 IST

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अध्यक्षपदासाठी सकाळी ११ ...

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अध्यक्षपदासाठी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे आ. सुरेश वरपूडकर व प्रेरणा वरपूडकर यांचा आणि विरोधी बोर्डीकर गटाकडून हिंगोलीचे माजी खा. शिवाजी माने यांचा अर्ज दाखल झाला. छाननीत शिवाजी माने यांचा अर्ज अवैध ठरला, तर निश्चित केलेल्या वेळेत अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज प्रेरणा वरपूडकर यांनी मागे घेतला. त्यामुळे आ. सुरेश वरपूडकर यांची बिनविरोध निवड झाली. उपाध्यक्षपदासाठी वरपूडकर गटाकडून हिंगोली जिल्ह्यातील शिवसेनेचे राजेश पाटील गोरेगावकर, तर बोर्डीकर गटाकडून भगवानराव सानप यांचा अर्ज दाखल झाला. यावेळी सानप यांनी त्यांचा अर्ज परत घेतला. त्यामुळे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. त्यानंतर अध्यक्षपदी आ. वरपूडकर व उपाध्यक्षपदी पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली.

राष्ट्रवादीच्या पक्ष निरीक्षकांच्या भूमिकेने वातावरण पलटले

माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांना विमा घोटाळा प्रकरणात जिल्हा बँकेत जाण्यास न्यायालयाने एका आदेशान्वये बंदी घातली आहे. त्यामुळे या निवडणुकीत मतदान करण्याच्या अनुषंगाने बँकेत जाण्यास परवानगी मागणारा अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात बोर्डीकर यांनी दाखल केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे बोर्डीकर गटात सोमवारी निराशेचे वातावरण होते. काठावर असलेले संख्याबळ आणखी कमी झाल्याने मतांची जुळवाजुळव होणे, या गटास अशक्य वाटत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यावरच या गटाची पूर्ण दारोमदार होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती केली. दांडेगावकर यांनी मंगळवारी सकाळीच राष्ट्रवादीच्या ४ सदस्यांची परभणीत बैठक घेतली, तसेच पक्षाचे सर्व सदस्य महाविकास आघाडीसाेबतच राहतील, असे वरिष्ठांचे आदेश असल्याचे सांगितले. त्यामुळे बैठकीस उपस्थित आ. दुर्राणी हे नाराज होऊन पाथरीला निघून गेले. परिणामी बोर्डीकर गटाचे बँकेचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.