परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 01:51 PM2021-04-06T13:51:24+5:302021-04-06T13:52:09+5:30

बोर्डीकर गटाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही.

Varpudkar as the Chairman of Parbhani District Bank and Goregaonkar as the Vice Chairman without any objection | परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर बिनविरोध

परभणी जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी वरपूडकर तर उपाध्यक्षपदी गोरेगावकर बिनविरोध

googlenewsNext

परभणी : परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी काँग्रेसचे आ. सुरेश वरपूडकर यांची तरउपाध्यक्षपदी हिंगोलीतील राजेश पाटील गोरेगावकर यांची मंगळवारी बिनविरोध निवड झाली आहे. 

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीसाठी मंगळवारी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. या अनुषंगाने अध्यक्षपदासाठी सकाळी ११ वाजता काँग्रेसचे आ. सुरेश वरपूडकर व प्रेरणा वरपूडकर यांचा तर उपाध्यक्ष पदासाठी हिंगोली जिल्ह्यातील राजेश पाटील गोरेगावकर यांचा अर्ज दाखल झाला. बोर्डीकर गटाकडून एकही अर्ज दाखल झाला नाही. निश्चित केलेल्या वेळेत अध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज प्रेरणा वरपूडकर यांनी मागे घेतला. त्यामुळे अध्यक्षपदी आ. सुरेश वरपूडकर व उपाध्यक्षपदी राजेश पाटील गोरेगावकर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक मंगेश सुरवसे यांनी केली. 

बोर्डीकर गटात निराशा
माजी आ. रामप्रसाद बोर्डीकर यांचा निवडणुकीत मतदान करण्याच्या अनुषंगाने बँकेत जाण्यास परवानगी मागणी करणारा अर्ज सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळला. त्यामुळे बोर्डीकर गटात सोमवारी निराशेचे वातावरण होते. काठावर असलेले संख्याबळ आणखी कमी झाल्याने मतांची जुळवाजुळव होणे या गटास अशक्य वाटत होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आ. बाबाजानी दुर्राणी यांच्यावरच या गटाची दारुमदार होती. राष्ट्रवादी काँग्रेसने या निवडणुकीसाठी पक्ष निरीक्षक म्हणून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांची नियुक्ती केली. दांडेगावकर यांनी मंगळवारी सकाळीच राष्ट्रवादीचे सदस्य महाविकास आघाडीसाेबतच राहतील, अशी भूमिका घेतली. त्यामुळे साहजिकच वरपूडकर गटासोबतच राष्ट्रवादीचे सदस्य राहणार असल्याने आ.दुर्राणी हे नाराज होवून पाथरीला निघून गेले. परिणामी बोर्डीकर गटाचे बँकेचे सत्ता मिळविण्याचे मनसुबे धुळीस मिळाले.

Web Title: Varpudkar as the Chairman of Parbhani District Bank and Goregaonkar as the Vice Chairman without any objection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.