वैजनाथराव रसाळ हे शेतकरी चळवळीचे शिल्पकार : परभणीत राजू शेट्टी यांचे प्रतिपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 00:29 IST2018-02-05T00:29:33+5:302018-02-05T00:29:57+5:30
शेतकºयांसाठी आपले आयुष्य वेचणारे वैजनाथराव रसाळ हे शेतकरी चळवळीचे जिल्ह्यातील शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार खा़ राजू शेट्टी यांनी काढले़

वैजनाथराव रसाळ हे शेतकरी चळवळीचे शिल्पकार : परभणीत राजू शेट्टी यांचे प्रतिपादन
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : शेतकºयांसाठी आपले आयुष्य वेचणारे वैजनाथराव रसाळ हे शेतकरी चळवळीचे जिल्ह्यातील शिल्पकार असल्याचे गौरवोद्गार खा़ राजू शेट्टी यांनी काढले़
परभणी तालुक्यातील नांदापूर येथे ४ फेब्रुवारी रोजी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हा संघटक वैजनाथराव धोंडजी रसाळ यांच्या मरणोत्तर कार्यगौरव सोहळ्यात शेट्टी बोलत होते़ यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, कालिदास आपेट, ब़ल़ तामसकर, मराठवाडा अध्यक्ष माणिक कदम, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रसिका ढगे, प्रदेशाध्यक्ष प्रकाश पोफळे, शरद जोशी प्रणित संघटनेचे जिल्हाध्यक्ष गजानन देशमुख, अमृत शिंदे, प्रा़ डॉ.जयंत बोबडे, गंगाधर कुरूंदकर आदींची प्रमुख उपस्थिती होती़ खा़राजू शेट्टी यांनी या कार्यक्रमात रसाळ यांच्या कार्याचा गौरव केला़ प्रारंभी नांदापूर येथे उभारण्यात आलेले कमानीला वैजनाथराव रसाळ यांचे नाव देण्यात आले असून, या कमानीचे उद्घाटन खा़ शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले़ मुख्य कार्यक्रमात शेतकरी संघटनेचे कालिदास आपेट यांनीही वैजनाथराव रसाळ यांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करीत त्यांच्याविषयीचे अनुभव कथन केले़
शेतकºयांच्या प्रश्नावर कायम अग्रभागी असणारे वैजनाथराव रसाळ यांनी अनेक आंदोलने केली आणि शेतकºयांना न्याय मिळवून देण्याचे काम रसाळ यांनी केले़ शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या विचारांनी प्रभावित होवून त्यांनी चळवळ गतीमान केली, असेही आपेट म्हणाले़
यावेळी गजानन देशमुख, प्रकाश पोफळे आदींची भाषणे झाली़ अशोक रसाळ यांनी प्रास्ताविक केले़ सुभाष ढगे यांनी सूत्रसंचालन केले़ मनोहर रसाळ यांनी आभार मानले़ कार्यक्रमास शेतकरी संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते़ यशस्वीतेसाठी अशोक रसाळ, अच्युत रसाळ, ज्ञानेश्वर रसाळ, माजी सरपंच विश्वांभर रसाळ, सरपंच सुनीत लांडगे, अशोक रसाळ, संपतराव रसाळ, वसंतराव रसाळ, रामराव लांडगे, मधुकर रसाळ, भगवान रसाळ, मुरलीधर रसाळ, अनंत रसाळ, प्रा़डॉ.जयंत बोबडे आदींसह ग्रामस्थांनी प्रयत्न केले़