आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांनाच दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:16 IST2021-05-16T04:16:39+5:302021-05-16T04:16:39+5:30
मगच लस मिळेल, असे मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे अनेक जण गोंधळात पडले. काहींनी लस घेतली ती चाचणी ...

आरटीपीसीआर चाचणी केलेल्यांनाच दिली लस
मगच लस मिळेल, असे मनपा आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. यामुळे अनेक जण गोंधळात पडले. काहींनी लस घेतली ती चाचणी केल्यावर आणि काहींनी चाचणी करण्यापेक्षा लस न घेतलेली बरी, असे म्हणून केंद्रावरून काढता पाय घेतला. निर्णयाची माहिती शहरात ठिकठिकाणी पोहोचल्याने एकच गोंधळ उडाला.
निर्णय घेतला मागे
लस घेण्यापूर्वी आरटीपीसीआर चाचणी करावी, असा सकाळी घेतलला निर्णय अखेर दुपारी मागे घेण्यात आला. मात्र, यामुळे शहरातील केंद्रांवर दररोजपेक्षा लस घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्याचे दिसून आले.
मला पहिली लस घ्यायची होती. यासाठी मुलगा टोकन घेण्यासाठी खानापूर फाटा येथील केंद्रावर गेला होता. तेथे आधी चाचणी केल्यावर लस मिळेल असे सांगितल्याने लस घेणे टाळले.
- भारती भास्करराव नाईक
केंद्र पडले ओस
शहरतील खानापूर फाटा, शंकरनगर, जायकवाडी, बालविद्या मंदिर प्रशाला येथील केंद्रांवर दुपारी पाहणी केली असता तेथे नागरिकांची संख्या या निर्णयामुळे कमी झाल्याचे दिसून आले. यामुळे हे केंद्र ओस पडले होते. प्रभागातील नागरिकांना लस घेण्यासाठी नगरसेवक व त्यांच्या प्रतिनिधींनी तसेच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दुपारनंतर केंद्रावर लस घेण्यासाठी आणल्याचे दिसून आले.