शहरात १३ केंद्रावर आज लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:17 AM2021-09-13T04:17:50+5:302021-09-13T04:17:50+5:30

यामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध राहणार असून यासाठी ऑनलाईन नोंदणी तसेच स्पॉट नोंदणी करणाऱ्यांचे लसीकरण केले ...

Vaccination today at 13 centers in the city | शहरात १३ केंद्रावर आज लसीकरण

शहरात १३ केंद्रावर आज लसीकरण

Next

यामध्ये कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी उपलब्ध राहणार असून यासाठी ऑनलाईन नोंदणी तसेच स्पॉट नोंदणी करणाऱ्यांचे लसीकरण केले जाणार आहे. १८ वर्षांच्या पुढील लाभार्थ्यांसाठी दोन्ही डोस उपलब्ध राहणार आहेत. यात जायकवाडी रुग्णालय, इनायतनगर, खानापूर रुग्णालय, खंडोबा बाजार, साखला प्लॉट, शंकर नगर, वर्मानगर, बालविद्यामंदिर, शेतकरी भवन कृषी विद्यापीठ येथे लसीकरण मोहीम राबविली जाणार आहे.

तसेच मुख्य बाजारातील शिवाजी चौक येथे रविवारी व्यापारी वर्गासाठी लसीकरण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सोमवारी अजून ३ ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू केले जाणार आहेत. यामध्ये वडगल्ली, कोठारी कॉम्प्लेक्स, उद्देश्वर विद्यालय व शिवाजी चौक असे एकूण चार केंद्र व्यापाऱ्यांसाठी सुरु राहणार आहेत.

रविवारी २ हजार ९२० जणांचे लसीकरण

जिल्ह्यात रविवारी २ हजार ९२० जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. एकूण ७८ केंद्रांवर लसीकरण प्रक्रिया पार पडली. शनिवारी दिवसभरात १० हजार ५५१ जणांचे लसीकरण झाले होते. या तुलनेत रविवारी लसीकरणाची संख्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.

Web Title: Vaccination today at 13 centers in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.