१८ वर्षांवरील व्यक्तींचे ५ केंद्रांवर लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:16 IST2021-05-01T04:16:19+5:302021-05-01T04:16:19+5:30

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस ...

Vaccination of persons above 18 years of age at 5 centers | १८ वर्षांवरील व्यक्तींचे ५ केंद्रांवर लसीकरण

१८ वर्षांवरील व्यक्तींचे ५ केंद्रांवर लसीकरण

कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. या अनुषंगाने केंद्र शासनाने १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस १ मेपासून देण्याचा निर्णय घेतला आहे. असे असले तरी सर्वत्र लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे परभणी जिल्ह्यात ही मोहीम सुरू होणार की नाही, याविषयी शंका उपस्थित होत होती. परंतु, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्या प्रयत्नाने प्रातिनिधिक स्वरूपात का होईना, या मोहिमेस १ मेपासून प्रारंभ होणार आहे. या मोहिमेंतर्गत जिल्ह्याला शुक्रवारी रात्रीपर्यंत ७ हजार ५०० लसींचे डाेस औरंगाबादहून मिळणार आहेत. त्यानंतर १ मे रोजी दुपारी १२ वाजेपासून शहरातील जिल्हा सामान्य रुग्णालयातील लसीकरण केंद्र व मनपाच्या चार अशा एकूण ५ लसीकरण केंद्रांवर १८ वर्षांवरील व्यक्तींना लस देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी दिली. लस उपलब्ध झाल्यानंतर ग्रामीण भागात ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Vaccination of persons above 18 years of age at 5 centers