पोखर्णी येथे १०८ जणांना दिली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:15 IST2021-04-12T04:15:54+5:302021-04-12T04:15:54+5:30
पोखर्णी परिसरात मागील काही दिवसांपासून आरोग्य विभागाच्या वतीने पोखर्णी येथील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. यावेळी लसीकरणाचे ...

पोखर्णी येथे १०८ जणांना दिली लस
पोखर्णी परिसरात मागील काही दिवसांपासून आरोग्य विभागाच्या वतीने पोखर्णी येथील ४५ वर्षांवरील नागरिकांना लस देण्यात येत आहे. यावेळी लसीकरणाचे उद्घाटन करताना सरपंच तुकाराम मडके, पोलीस पाटील श्रीराम तावरे, लक्ष्मणराव वाघ, आरोग्य अधिकारी यु. टी. राठोड, किरणताई बेंद्रे, डॉ. जयश्री रांजने, सरिता घाटोळ, दिगंबर एडके, गजानन जोरवर, रामचंद्र शिंदे, डॉ. आडसुळ, डॉ. किरण सातपुते, डॉ. शिंदे, राजकुमार वाघ, नामदेव आव्हाड, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, आदींची उपस्थिती होती. आरोग्य उपकेंद्रात लसीकरणासाठी जिल्हा परिषद शाळेतील तीन रूममध्ये व्यवस्था करण्यात आली होती. एका रूममध्ये नोंदणी, दुसऱ्या रूममध्ये लसीकरण, तर तिसऱ्या रूममध्ये लसिकरणानंतर अर्धा तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली थांबण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी गावातील १०८ नागरिकांना लस देण्यात आली. दरम्यान, नागरिकांचा लसीकरणासाठी प्रतिसाद पाहता शुक्रवारपासून पुन्हा लसीकरण करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.