पालम तालुक्यात ५० हजार ग्रामस्थांचे लसीकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:19 IST2021-09-11T04:19:44+5:302021-09-11T04:19:44+5:30
जिल्हाधिकारी आंचल गोयल ९ सप्टेंबर रोजी पालम तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी तहसील कार्यालयात कोरोना लसीकरणाचा धावता आढावा घेतला. ...

पालम तालुक्यात ५० हजार ग्रामस्थांचे लसीकरण
जिल्हाधिकारी आंचल गोयल ९ सप्टेंबर रोजी पालम तालुक्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यांनी तहसील कार्यालयात कोरोना लसीकरणाचा धावता आढावा घेतला. बैठकीला उपविभागीय अधिकारी अशिष बारकुल, तहसीलदार प्रतिभा गोरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. कालिदास निरस उपस्थित होते.
यावेळी गोयल यांनी तालुक्यातील कोराना रुग्ण, लसीकरण आदीबाबत माहिती घेतली. त्यानंतर पालम तालुक्यातील १५ गावांत मेगा लसीकरणाचे नियोजन तालुका आरोग्य विभागाने केले. त्यात तालुक्यातील प्रत्येक आरोग्य उपकेंद्राच्या ठिकाणी शनिवारी लसीकरण ठेवण्यात आले आहे. यामध्ये केरवाडी, खडी, पेठपिंपळगाव, खोरस, रावराजूर, फळा, फरकंडा, शेखराजूर, नाव्हलगाव, तांदुळवाडी, बनवस, उक्कडगाव, कोळवाडी, पेठशिवणी, वाणी पिंपळगावचा समावेश आहे.
तत्पूर्वी या गावांत दवंडी, ध्वनिक्षेपकाद्वारे जनजागृती करण्यात आली आहे. शिवाय या लसीकरणासाठी जबाबदारी निश्चित केली असून त्यात हयगय केल्यास कार्यवाहीच्या सूचना निरस यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, तालुक्यात कोविडच्या दोन टप्प्यांमध्ये ८२ गावांमधील ५० हजार ग्रामस्थांना लस देण्यात आली आहे.