केंद्र, राज्याच्या वादात अडकली १० हजार नागरिकांची लस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:18 AM2021-05-07T04:18:21+5:302021-05-07T04:18:21+5:30

परभणी : केंद्र शासनाने दिलेली कोविशिल्डची लस ४५ वर्षांत पुढील नागरिकांसाठी, तर राज्य शासनाने खरेदी केलेली कोव्हॅक्सिनची लस १८ ...

Vaccination of 10,000 citizens caught up in central, state disputes | केंद्र, राज्याच्या वादात अडकली १० हजार नागरिकांची लस

केंद्र, राज्याच्या वादात अडकली १० हजार नागरिकांची लस

Next

परभणी : केंद्र शासनाने दिलेली कोविशिल्डची लस ४५ वर्षांत पुढील नागरिकांसाठी, तर राज्य शासनाने खरेदी केलेली कोव्हॅक्सिनची लस १८ ते ४४ वर्षे वयोगटातील नागरिकांसाठी वापरली जात आहे. त्यामुळे केंद्र व राज्याच्या या धोरणामुळे कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या जिल्ह्यातील सुमारे १० हजार नागरिकांना लस केव्हा मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोना लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात जिल्ह्याला कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी मिळाल्या. मात्र लसीकरणाला प्रतिसाद मिळाल्यानंतर लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यातच १ मेपासून १८ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले. या नागरिकांसाठी राज्य शासनाने कोव्हॅक्सिनची १२ हजार लसीची मात्रा जिल्ह्याला दिली आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार, प्राप्त लसीतून १८ ते ४४ वर्षांपर्यंतच्या नागरिकांना प्राधान्याने लसीकरण केले जात आहे, तर केंद्र शासनाने कोविशिल्डचे २२ हजार डोस जिल्ह्याला दिले असून, यामधून ४५ वर्षांपुढील नागरिकांसाठी लसीकरण केले जात आहे.

दोन्ही सरकारांच्या या धोरणामुळे मात्र दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची अडचण झाली आहे. कोविशिल्डची लस घेतलेल्या १८ हजार ८०० नागरिकांना दुसरा डोस द्यावयाचा आहे, तर कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या ४० हजार ४३ नागरिकांना दुसरा डोसची प्रतीक्षा आहे. परंतु दोन्ही लसीकरणासाठी वेगवेगळी वयोमर्यादा निश्चित केल्याने दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांचे काय? असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच कोव्हॅक्सिनच्या १० हजार नागरिकांसाठी लसीचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या प्राप्त झालेली कोव्हॅक्सिनची १२ हजार लस १८ ते ४४ वर्षे वयोगटासाठीच वापरली जात आहे. कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या अनेक नागरिकांच्या दुसऱ्या डोसच्या तारखा निघून गेल्या आहेत; परंतु तरीही शासनाकडून या नागरिकांसाठी कोणतीही उपाययोजना केली नाही. त्यामुळे दुसरा डोस घेणाऱ्या नागरिकांना लसीची प्रतीक्षा करावी लागत आहे.

४० हजार नागरिकांनी घेतली कोव्हॅक्सिन

जिल्ह्यात आतापर्यंत १ लाख ८५ हजार १९९ नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामध्ये १ लाख ४५ हजार १५६ नागरिकांनी कोविशिल्ड ही लस घेतली असून, ४० हजार ४३ नागरिकांनी कोव्हॅक्सिन ही लस घेतली आहे. कोविशिल्ड घेतलेल्या नागरिकांपैकी १८ हजार ८०० नागरिकांची दुसऱ्या डोसची तारीख निघून गेली आहे; तर कोव्हॅक्सिन लस घेतलेल्या ४० हजार नागरिकांपैकी १० हजार नागरिकांची दुसऱ्या डोसची तारीख निघून गेली आहे. त्यामुळे या नागरिकांसाठी लस केव्हा मिळणार? हा प्रश्न सध्या तरी अनुत्तरीतच आहे.

Web Title: Vaccination of 10,000 citizens caught up in central, state disputes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.