शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
4
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
5
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
6
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
7
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
8
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
9
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
10
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
11
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
12
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
13
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
14
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
15
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
16
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
17
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
18
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
19
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
20
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
Daily Top 2Weekly Top 5

आठ आरोग्य कर्मचाऱ्यांची पदे रिक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:17 IST

पाथरी : तालुक्यातील वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक व शिपाई यांची आठ पदे रिक्त आहेत. त्यामुळे ...

पाथरी : तालुक्यातील वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य परिचारिका, आरोग्यसेवक व शिपाई यांची आठ पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णसेवा पूर्णपणे कोलमडली आहे. परिणामी, रुग्ण व नातेवाइकांची गैरसोय होत आहे.

पाथरी तालुक्यातील वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत १७ गावांतील २४ हजार ग्रामस्थांचा समावेश आहे. या ग्रामस्थांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी या प्राथमिक आरोग्य केंद्रासह तुरा व रेणापूर येथील दोन आरोग्य उपकेंद्रांवर आहे. तसेच आता नव्याने मुद्‌गल व देवनांदरा येथे आरोग्य उपकेंद्राची इमारत उभी करण्यात आली आहे. सद्य:स्थितीत ही दोन केंद्रे सुरू होणे बाकी आहे. त्यामुळे वाघाळा येथील आरोग्य केंद्रावर रुग्णसेवेचा मोठा भार आहे. त्यामुळे हे आरोग्य केंद्र औषध, गोळ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी परिपूर्ण असणे गरजेचे आहे. मात्र, सद्य:स्थितीत या केंद्राला चार परिचारिकांची आवश्यकता असताना दोन पदे रिक्त आहेत. आरोग्यसेवक २ व शिपायाची ४ अशी एकूण ८ पदे रिक्त आहेत. त्यामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आरोग्य शिबिर, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया आदी कार्यक्रम ठप्प झाले आहेत. उपलब्ध डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करून रुग्णांवर उपचार करावे लागत आहेत. त्यामुळे रुग्ण व नातेवाइकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

रिक्त पदे तत्काळ भरा

वाघाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात २४ हजार नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी असतानाही या ठिकाणी दोन आरोग्य परिचारिका व आरोग्यसेवक व शिपायांची पदे रिक्त असताना रुग्णांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. एकीकडे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी पावले उचलत असताना दुसरीकडे मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे रुग्णांची गैरसोय होत आहे.