शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
8
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
9
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
10
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
11
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
12
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
13
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
14
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
15
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
16
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
17
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
18
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
19
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
20
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
Daily Top 2Weekly Top 5

परभणीला अवकाळीचा तडाखा; विजांचा कडकडाट, वादळी वारे अन पावसाने उडाली तारांबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 18:59 IST

सकाळपासून कडक उन्हाचा अनुभव घेतलेल्या परभणीकरांना दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला.

ठळक मुद्देजोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या सुध्दा अनेक ठिकाणी उडून पडल्या. एक तास झालेल्या पावसाने शहरातील काही भागाचा वीज पुरवठा खंडित

परभणी : शहर व परिसराला २८ मे रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास पावसाने झोडपले. हा पाऊस सुरू असतानाच विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे सुटल्याने अनेक भागातील रस्त्यावरील झाडे उन्मळून पडली. तसेच शहरातील बहुतांश भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. पावसाळ्यापूर्वी झालेल्या पहिल्याच जोरदार पावसात शहरातील अनेक रस्ते जलमय झाले होते.

परभणी शहरात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास वातावरणात बदल झाला. सकाळपासून कडक उन्हाचा अनुभव घेतलेल्या परभणीकरांना दुपारी झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला. विजेचा कडकडाट आणि त्यातच वारे सुटल्याने पावसात काही वेळ नागरिकांची तारांबळ उडाली. तीन ते चार वेळा जोरदार विजेचा कडकडाट झाल्याचे एकावयास मिळाले. 

एक तास झालेल्या पावसाने शहरातील काही भागाचा वीज पुरवठा खंडित झाला होता तर काही भागांमध्ये झाडे उन्मळून पडली. यामध्ये दादाराव प्लॉट परिसरातील काही झाडे वाऱ्याने रस्त्यावर आडवी पडली. जोरदार वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या सुध्दा अनेक ठिकाणी उडून पडल्या. पडलेल्या झाडांना रस्त्यावरून हटवण्यासाठी मनपाच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रयत्न केले. दरम्यान, गावठाण भागातील रस्त्यावर पाणी साचले होते. हा पाऊस एक तासाने बंद झाला. जिल्ह्यात अन्य ठिकाणी पाऊस झाला नाही मात्र, गंगाखेड, परभणी तालुक्यातील पोखर्णी येथे जोरदार वारे आणि ढगाळ वातावरण झाल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Rainपाऊसparabhaniपरभणी