कोलाज बनवीत तथागत गौतम बुद्ध यांना अनोखे अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:19 IST2021-05-27T04:19:10+5:302021-05-27T04:19:10+5:30
महामानवांची जयंती, विविध सण आणि उत्सवांच्या काळात आपल्या कलेच्या माध्यमातून अभिवादन करीत समाजप्रबोधन करण्याचे कार्य येथील कलाकार संकेत गाडेकर ...

कोलाज बनवीत तथागत गौतम बुद्ध यांना अनोखे अभिवादन
महामानवांची जयंती, विविध सण आणि उत्सवांच्या काळात आपल्या कलेच्या माध्यमातून अभिवादन करीत समाजप्रबोधन करण्याचे कार्य येथील कलाकार संकेत गाडेकर याने हाती घेतले आहे.
बुद्ध पौर्णिमेनिमित्त अशीच कलाकृती निर्माण करण्याचा संकल्प एटीडीचे शिक्षण घेत असलेल्या संकेत गाडेकर या विद्यार्थ्याने केला. त्यातूनच परिसरातील विविध झाडांची लाकडे जमा करून त्यापासून तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा साकारली. ही प्रतिमा बनविण्यासाठी २५ तासांचा अवधी लागला, असे गाडेकर याने सांगितले. गौतम बुद्ध यांनी जगाला शांतीचा तसेच स्वयंप्रकाशित होण्याचा संदेश दिला आहे. या कलाकृतीतून हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचे संकेत गाडेकर याने सांगितले.
रंगांचा केला नाही वापर
तथागत गौतम बुद्ध यांची प्रतिमा साकारताना एकाही रंगाचा वापर केला नाही. विविध रंगांचे लाकडे वापरून नैसर्गिक रंगांच्या माध्यमातून ही प्रतिमा साकारली असल्याचे गाडेकर यांनी सांगितले.