शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
5
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
6
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
9
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
10
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
11
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
12
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
13
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
14
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
15
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
16
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
17
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
18
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
19
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
20
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धवसेनेचे नगरसेवक परभणीत मध्यरात्री दाखल; महापौर निवडीपूर्वी काँग्रेससोबत एकत्रित बैठक

By राजन मगरुळकर | Updated: February 12, 2026 11:16 IST

बी रघुनाथ सभागृहाच्या परिसराला पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेमुळे छावणीचे स्वरूप आले आहे.

परभणी : परभणी शहराच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडीला अवघा एक तास शिल्लक आहे. सध्या परभणी महापालिकेतील उद्धवसेना आणि काँग्रेस यांच्या ३७ नगरसेवकांची एकत्रित बैठक पाथरी रोडवरील मोरया लॉन्स येथे सुरू आहे. त्यामुळे अकरा वाजता सुरू होणाऱ्या सभेपूर्वी दोन्ही पक्षाकडून महापौर आणि उपमहापौर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर हे सर्व सदस्य विशेष सभा होणाऱ्या बी रघुनाथ सभागृहात एकत्रित दाखल होणार आहेत. 

उद्धवसेनेचे २५ नगरसेवक मुंबईहून मध्यरात्री परभणी शहरातील एका लॉन्सवर दाखल झाले.  काँग्रेसचे १२ सदस्य देखील या ठिकाणी सकाळी पोहोचले. बुधवारी रात्री खासदार संजय जाधव, आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी सर्व सदस्यांची भेट घेतली. गुरुवारी सकाळपासून सर्व सदस्यांचे एकत्रित चर्चा आणि बैठका सुरू आहेत. महापौर निवडीची आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी अंतिम बैठक या दोन्ही पक्षातील प्रमुख नेत्यांकडून घेतले जात आहे. 

बी.रघुनाथ सभागृहाला छावणीचे स्वरूप महापौर आणि उपमहापौर यांच्या पदाची निवड वसमत रोडवरील बी रघुनाथ सभागृह येथे अकरा वाजता पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. या बैठकीसाठी पोलीस प्रशासनाने सकाळी नऊ वाजेपासूनच या ठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवला आहे. सभागृहातील मुख्य प्रवेशद्वारातून महापालिका आणि प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी यांना ओळखपत्र तपासून सोडले जात आहे तर अकरा वाजता सर्व सदस्य दाखल झाल्यानंतर त्यांचेही ओळखपत्र तपासून प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे या निवडीपूर्वीच बी रघुनाथ सभागृहाच्या परिसराला पोलिसांच्या कडेकोट सुरक्षेमुळे छावणीचे स्वरूप आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Sena Corporators Arrive in Parbhani; Meeting Before Mayor Election

Web Summary : Uddhav Sena and Congress corporators gathered in Parbhani before the mayoral election. A joint meeting was held to finalize candidates before the special assembly. Security was heightened at the B Raghunath Hall, resembling a cantonment, for the election proceedings.
टॅग्स :Municipal Electionमहाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक २०२६Parbhani Municipal Corporation Electionपरभणी महानगरपालिका निवडणूक निकाल २०२६Shiv Senaशिवसेना