शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

गंगाखेडमध्ये हायवाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 6:37 PM

वाळूने भरलेला हायवा महसुल प्रशासनाने पिंपळदरी पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

गंगाखेड (परभणी ) : वाळूने भरलेल्या हायवा वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (दि. २२ ) सकाळी ८ वाजेच्या सुमारास तालुक्यातील खोकलेवाडी पाटीजवळ घडली. यात गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वारास गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून लातुर येथे हलविले आहे तर वाळूने भरलेला हायवा महसुल प्रशासनाने पिंपळदरी पोलीस ठाण्यात जमा केला आहे.

गंगाखेड ते पिंपळदरी रस्त्याने भरधाव वेगात जाणाऱ्या विनापरवाना वाळूने भरलेल्या हायवा वाहनाच्या चालकाने खोकलेवाडी पाटीजवळ सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकीला समोरासमोर जोराची धडक दिली. यामुळे दुचाकीवरील सुधाकर विठ्ठलराव बोके वय ५५ वर्ष रा. खोकलेवाडी ता. गंगाखेड यांचे दोन्ही हात व डाव्या पायाला गंभीर मार मागून फॅक्चर झाले आहे. अपघाताची घटना घडताच चालकाने पळ काढला तर घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी गंभीर जखमी बोके यांना गंगाखेड उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. रेश्मा गौस, परिचारिका रिता मरमट, श्रीमती सुनंदा हटकर, प्रशांत राठोड यांनी प्रथमोपचार करून गंभीर जखमी सुधाकर बोके यांना पुढील उपचारासाठी लातुर येथे हलविले आहे.

हायवा पिंपळदरी पोलीस ठाण्यातपिंपळदरी रस्त्यावर खोकलेवाडी पाटीजवळ दुचाकीला धडक देणाऱ्या हायवा वाहनात विनापरवाना वाळु भरलेली असल्याची माहिती समजताच राणीसावरगाव मंडळाचे मंडळ अधिकारी बालाजी लटपटे, सुप्पा सज्जाचे तलाठी भगवान सुक्रे यांनी अपघातस्थळी जाऊन पोलीस नाईक लक्ष्मणराव कांगणे यांच्या सहकार्याने अवैधरित्या वाळूची वाहतुक करणारा वाळूने भरलेला अपघातग्रस्त हायवा पिंपळदरी पोलीस ठाण्यात जमा करून त्याचा अहवाल गंगाखेड तहसील कार्यालयात सादर केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातparabhaniपरभणीhighwayमहामार्ग