दुचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातात दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:15 IST2021-01-18T04:15:48+5:302021-01-18T04:15:48+5:30
तालुक्यातील महातपुरी तांडा येथील शेषराव शंकर राठोड (४३) हे १६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम ...

दुचाकी व ट्रॅक्टरच्या अपघातात दुचाकीस्वार ठार
तालुक्यातील महातपुरी तांडा येथील शेषराव शंकर राठोड (४३) हे १६ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास दुचाकी क्रमांक एम एच ३४-ए जे ९८७३ वरून सोनपेठ रस्त्याने शेताकडे जात होते. दरम्यान, समोरून येत असलेल्या उसाच्या ट्रॅक्टर क्रमांक एम एच २२-एक्स २१३ च्या चालकाने आपल्या ताब्यातील ट्रॅक्टर भरधाव वेगात व निष्काळजीपणे चालवून शेषराव शंकर राठोड यांच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिली. महातपुरी तांड्यापासून जवळच एक किलोमीटर अंतरावर अपघात झाल्याची माहिती समजताच प्रकाश किशन चव्हाण व बाबाराव राठोड यांनी घटनास्थळी धाव घेऊन गंभीर जखमी झालेल्या शेषराव राठोड यांना उपचारासाठी गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. पी.आर. चट्टे यांनी त्यांना तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी मयताचा भाऊ बाबाराव शंकर राठोड यांनी सोनपेठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ट्रॅक्टरचालक विजय दत्ता चव्हाण याच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार अनिल शिंदे, संजय अळनुरे हे करीत आहे.