दुचाकीस्वाराने लांबविला मोबाइल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 00:19 IST2017-11-22T00:19:08+5:302017-11-22T00:19:19+5:30
रस्त्याने जाणाºया एका युवकाच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकी चालकाने पलायन केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री ७़४५ वाजण्याच्या सुमारास गव्हाणे चौक भागात घडली़

दुचाकीस्वाराने लांबविला मोबाइल
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : रस्त्याने जाणाºया एका युवकाच्या हातातील मोबाइल हिसकावून दुचाकी चालकाने पलायन केल्याची घटना २० नोव्हेंबर रोजी रात्री ७़४५ वाजण्याच्या सुमारास गव्हाणे चौक भागात घडली़
पूर्णा तालुक्यातील शिरकळस येथील अनंता गणेशराव भोसले हा युवक २० नोव्हेंबर रोजी परभणी येथे आला होता़ गव्हाणे चौकातील कॅनरा बँक ते विजय फर्टिलायझर परिसरात एमएच २२/१४९५ या दुचाकीवरून दोघे जण आले़ त्यांनी आपल्या हातातील मोबाईल हिसकावून पळ काढला़
९ हजार ७५० रुपये किंमतीचा हा मोबाईल होता़ या प्रकरणी अनंता भोसले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ हेकाँ मुलगीर तपास करीत आहेत़