पाथरी तालुक्यातून दोघांची दुचाकी लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:15 IST2021-07-17T04:15:08+5:302021-07-17T04:15:08+5:30
वरखेड येथील कृष्णा रमेश जगदाळे यांनी त्यांची एमएच २३ एएल २८७१ क्रमांकाची दुचाकी ४ जुलै रात्री १० वाजता घरासमोर ...

पाथरी तालुक्यातून दोघांची दुचाकी लंपास
वरखेड येथील कृष्णा रमेश जगदाळे यांनी त्यांची एमएच २३ एएल २८७१ क्रमांकाची दुचाकी ४ जुलै रात्री १० वाजता घरासमोर उभी केली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना त्यांची दुचाकी संबंधित ठिकाणी दिसली नाही. दुचाकीचा त्यांनी इतरत्र शोध घेतला; परंतु ती आढळून आली नाही. याबाबत त्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात १५ जुलै रोजी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या घटनेत पाथरी येथील तुकाराम लक्ष्मण गायकवाड यांनी त्यांची एमएच २१ एझेड २११९ क्रमांकाची दुचाकी १३ जुलै रोजी सकाळी ११.३०च्या सुमारास माजलगाव रोड जवळील रामपुरी फाटा येथे उभी केली होती. दुपारी १ वाजता ते दुचाकी उभी केलेल्या ठिकाणी आले असता त्यांना जागेवरून दुचाकी गायब असल्याचे दिसून आले. याबाबत त्यांनी पाथरी पोलीस ठाण्यात १४ जुलै रोजी फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.