परभणीतून दोघांची दुचाकी लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST2021-06-22T04:13:29+5:302021-06-22T04:13:29+5:30

शहरातील भावसार नगर भागातील प्रीती विठ्ठलराव कुलकर्णी यांनी त्यांची एमएच २२ एल ७५९० क्रमांकाची ॲक्टिव्हा दुचाकी २६ मे रोजी ...

Two-wheeler lampas from Parbhani | परभणीतून दोघांची दुचाकी लंपास

परभणीतून दोघांची दुचाकी लंपास

शहरातील भावसार नगर भागातील प्रीती विठ्ठलराव कुलकर्णी यांनी त्यांची एमएच २२ एल ७५९० क्रमांकाची ॲक्टिव्हा दुचाकी २६ मे रोजी शिवरामनगर भागात घरासमोर सायंकाळी ७ च्या सुमारास उभी केली होती. रात्री ९ च्या सुमारास सदरील दुचाकी जागेवरून गायब असल्याचे त्यांना दिसून आले. याबाबत त्यांनी नवा मोंढा पोलीस ठाण्यात १७ जून रोजी फिर्याद दिली आहे. त्यावरून अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी घटना गंगाखेड नाका भागात घडली. आर्वी येथील सोपान पंडितराव कदम यांनी १८ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास मनपाच्या कार्यालय परिसरात एमएच २२ एके १०६७ क्रमांकाची उभी करून ते रोपे आणण्यासाठी बाजूला गेले होते. काही वेळानंतर ते परत आले असता त्यांना त्यांची दुचाकी जागेवर दिसली नाही. याबाबत त्यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून १९ जून रोजी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सेलू, मानवत, पाथरी या शहरात दुचाकी चोरीच्या घटना घडत होत्या. त्याचे लोण आता परभणी शहरापर्यंत आले आहे. चोरटे मात्र पोलिसांना सापडत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

Web Title: Two-wheeler lampas from Parbhani