ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:58+5:302021-02-05T06:06:58+5:30
परभणी : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुचाकीवरील विद्यार्थिनी जखमी झाली आहे.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ...

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार
परभणी : भरधाव ट्रॅक्टरने धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून दुचाकीवरील विद्यार्थिनी जखमी झाली आहे.२८ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास कानसूर पाटीजवळ ही घटना घडली.
कानसूर वस्ती येथील अंकुश घागरमाळे यांची मेहुणी सायली ही सोनपेठ येथून शाळेतून बसने गावाकडे येत होती. डाकू पिंपरी येथे त्यांची बस बंद पडल्याने ती डाकू पिंपरी येथे थांबली होती. सायलीला गावाकडे घेऊन येण्यासाठी तिचे मेहुणे अंकुश घागरमाळे हे दुचाकीने डाकू पिंपरी येथे गेले होते. तेथून सायली हिस घेऊन येत असताना कानसूर गावाजवळ बाभळगावकडून विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात अंकुश घागरमाळे (वय २७) यांचा मृत्यू झाला. तर सायली गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी ललिता अंकुश घागरमाळे यांच्या फिर्यादीवरून ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे.