ओव्हरटेक करताना दुचाकीला अपघात; एक जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:54+5:302021-06-26T04:13:54+5:30

वसमत तालुक्यातील राजापूर येथील दुधाजी एकनाथ बरुडे हे २ जून रोजी दुपारी २च्या सुमारास त्यांच्या एमएच ३८ ए ०५४३ ...

Two-wheeler accident while overtaking; One person was injured | ओव्हरटेक करताना दुचाकीला अपघात; एक जण जखमी

ओव्हरटेक करताना दुचाकीला अपघात; एक जण जखमी

वसमत तालुक्यातील राजापूर येथील दुधाजी एकनाथ बरुडे हे २ जून रोजी दुपारी २च्या सुमारास त्यांच्या एमएच ३८ ए ०५४३ क्रमांकाच्या दुचाकीने ताडकळस येथून गावाकडे जात होते. पूर्णा तालुक्यातील गौर गाव परिसरात चुडावाकडून एक ट्रक येत होता. यावेळी त्यांच्या पाठीमागून गौर येथील शेषेराव विश्वनाथ पारवे हा त्याच्या दुचाकीवर येत होता. यावेळी बरुडे यांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात पारवे याने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात बरुडे यांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार घेतल्यानंतर दुधाजी बरुडे यांनी २४ जून रोजी चुडावा पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. त्यावरून आरोपी शेषेराव विश्वनाथ पारवे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Two-wheeler accident while overtaking; One person was injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.