सेलूत दोघांना चाकूने भोसकले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:16 IST2021-01-22T04:16:39+5:302021-01-22T04:16:39+5:30

सेलू :- किरकोळ कारणावरून दोन सख्या भावांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या ...

The two were stabbed in the cell | सेलूत दोघांना चाकूने भोसकले

सेलूत दोघांना चाकूने भोसकले

सेलू :- किरकोळ कारणावरून दोन सख्या भावांना चाकूने भोसकून गंभीर जखमी केल्याची घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सेलू शहरात घडली. याप्रकरणी पाच आरोपींविरुद्ध सेलू पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कृष्णा वैजीनथ पांचाळ आणि त्याचा भाऊ गोविंद पांचाळ हे दुचाकीने जात असताना ओव्हरटेक का केले, असे म्हणून आरोपी विजय वाघ, हनुमान वाघ, संजय वाघ, अमोल वाघ, सारंग वाघ यांनी कृष्णा पांचाळ व गोविंद पांचाळ यांच्या छातीवर, पोटावर चाकूचे वार केले. यात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले असून, त्यांना परभणी येथील खाजगी रूगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. कृष्णा पांचाळ यांच्या फिर्यादीवर विजय वाघ, हनुमान वाघ, संजय वाघ, अमोल वाघ, सारंग वाघ यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय वाघ यास पोलिसांनी अटक केली असून, उर्वरित आरोपी फरार आहेत. सहाय्यक पोलीस निरीक्षक अजयकुमार पांडे तपास करीत आहेत.

Web Title: The two were stabbed in the cell