दहा लाखांच्या दोन टिप्पर, सहा-साडेसहा ब्रास वाळू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:14 IST2021-05-29T04:14:44+5:302021-05-29T04:14:44+5:30
जिल्ह्यात वाळूचा बेसुमार उपसा केला जात असून, अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर पोलीस प्रशासन दररोज कारवाई करीत आहे. शहरापासून ...

दहा लाखांच्या दोन टिप्पर, सहा-साडेसहा ब्रास वाळू जप्त
जिल्ह्यात वाळूचा बेसुमार उपसा केला जात असून, अवैध वाळू वाहतूक करणार्या वाहनांवर पोलीस प्रशासन दररोज कारवाई करीत आहे. शहरापासून काही अंतरावर असलेल्या धार फाटा भागात वाळूचे दोन टिप्पर परभणी शहरात येत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर या पथकाने दोन्ही टिप्पर जप्त केले. चालकांकडे वाळू वाहतुकीची परवाना पावती विचारली असता ती नव्हती. त्यामुळे पोलिसांनी एमएच ०४ एफजे ८८६३ आणि एमएच ०४ एफएल १९६८ हे दोन टिप्पर आणि त्यातील ३६ हजार रुपये किमतीची साडेसहा ब्रास वाळू जप्त केली आहे. याप्रकरणी चालक विजय गंगाधर चोपडे व बन्सी हनुमंत चोपडे यांच्या विरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई स्थागुशाचे पोलीस उपनिरीक्षक विश्वास खोले, कर्मचारी दीपक मुंडे, जाकीर सय्यद, बंकट लटपटे, भागवत हुंडेकर, अनिल इंगळे, कपिल घोडके यांनी केली आहे.