परभणीत रात्री वाहनचालकास दोघांनी लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:13 IST2021-06-22T04:13:16+5:302021-06-22T04:13:16+5:30

मानवत तालुक्यातील वाणी येथील वाहनचालक विजय शिवमूर्ती लुंगारे हे १८ जून रोजी बेंगलोर एक्स्प्रेसने लातूर रोड येथे जाण्यासाठी रात्री ...

The two robbed the driver at night in Parbhani | परभणीत रात्री वाहनचालकास दोघांनी लुटले

परभणीत रात्री वाहनचालकास दोघांनी लुटले

मानवत तालुक्यातील वाणी येथील वाहनचालक विजय शिवमूर्ती लुंगारे हे १८ जून रोजी बेंगलोर एक्स्प्रेसने लातूर रोड येथे जाण्यासाठी रात्री १२.३०च्या सुमारास रेल्वेस्थानकावर आले. यावेळी त्यांना भूक लागल्याने त्यांनी रेल्वे स्टेशनबाहेर येऊन थांबलेल्या रिक्षामध्ये बसलेल्या व्यक्तीला हॉटेलची माहिती विचारली असता त्याने अपना काॅर्नर येथे मदनी हाॅटेलमध्ये बिर्याणी मिळते, असे सांगितले. त्यामुळे लुंगारे या रिक्षामध्ये बसून संबंधित ठिकाणी गेले असता रिक्षाचालक व त्याच्या सोबतच्या एकाने रिक्षा एका बोळीत नेली. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करून मारहाण करीत त्यांच्या जवळील १९ हजार ७७० रुपये, एक मोबाइल काढून घेतला व ते पळून गेले. त्यानंतर लुंगारे यांनी नानलपेठ, पोलीस ठाणे गाठून याबाबत फिर्याद दिली. त्यावरून २८ ते ३० वर्षांच्या दोन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Web Title: The two robbed the driver at night in Parbhani