जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:06 IST2021-02-05T06:06:14+5:302021-02-05T06:06:14+5:30
परभणी : जिल्ह्यात २ फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या केवळ दोन रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा ...

जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण नोंद
परभणी : जिल्ह्यात २ फेब्रुवारी रोजी कोरोनाच्या केवळ दोन रुग्णांची नोंद झाली असून, एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग आता मोठ्या प्रमाणात घटला आहे. जिल्हा प्रशासनाने नागरिकांच्या चाचण्या वाढविल्या असून, बाधित रुग्णांची संख्या मात्र लक्षणीयरीत्या घटली आहे. मंगळवारी प्रशासनाला १९२ नागरिकांचे अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये आरटीपीसीआरच्या १५६ अहवालात एकाचा आणि रॅपिड टेस्टच्या ३६ अहवालात १ अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. येथील जिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आता एकूण ७ हजार ९६३ रुग्ण झाले आहेत. त्यातील ७ हजार ६०७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ३१५ रुग्णांचा मृत्यू झाला असून, सध्या ४१ रुग्ण उपचार घेत आहेत.
उपचार घेणाऱ्या रुग्णांमध्ये आयटीआय हॉस्पिटलमध्ये १७, शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये १३ रुग्ण उपचार घेत आहेत. त्याचप्रमाणे ११ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत. कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटल्याने या रुग्णांसाठी उपलब्ध केलेल्या खाटा मोठ्या संख्येने शिल्लक आहेत. जिल्ह्यात कोरोना रुग्णांसाठी १ हजार ७११ खाटांची सुविधा केली आहे. त्यातील १ हजार ६७० खाटा रिक्त आहेत.