परभणी : स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने गंगाखेड येथे सापळा रचून दोन कुख्यात आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत. खून, जबरी चोरी करणारे हे दोन आरोपी पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी जिल्ह्यात झालेल्या जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणून आरोपी अटक करण्याच्या सूचना स्थानिक गुन्हा शाखेला दिल्या होत्या. १५ फेब्रुवारी रोजी स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकास ताडकळस ठाण्यात गुन्हा नोंद असलेला फरार आरोपी मुंजा तुकाराम कहाते (रा.पिंपरी देशमुख, ता. परभणी) हा त्याच्या साथीदारास गंगाखेड येथे येणार असल्याची माहिती मिळाली. या पथकाने तहसील कार्यालयासमोर सापळा रचून मुंजा तुकाराम कहाते व साथीदार केशव बाबुराव जरतारे (२०, रा.मुगट, ता.मुदखेड) यास ताब्यात घेतले. सदर आरोपींना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी ताडकळस व चुडावा येथील गुन्हे त्यांचा साथीदार अजिंक्य जगताप यांच्यासह केल्याचे मान्य केले.
आरोपींना पुढील कारवाईस चुडावा ठाण्यात हजर करण्यात आले. तपास उपविभागीय पोलीस अधिकारी समाधान पाटील करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती, उपनिरीक्षक वाघमारे, चंदनसिंह परिहार, अंमलदार रंगनाथ दुधाटे, सचिन भदर्गे, विलास सातपुते, लक्ष्मण कांगणे, राहुल परसोडे, सिद्धेश्वर चाटे, हनुमान ढगे, राम पौळ, नामदेव डुबे, परसराम गायकवाड, दिलीप निलपत्रेवार, उत्तम हणवते, संजय घुगे, गणेश कौटकर यांनी केली.