मनपा कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:13 IST2021-07-11T04:13:59+5:302021-07-11T04:13:59+5:30
मागील एक- दीड वर्षापासून मनपा कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा ताण सहन करावा लागत आहे. ...

मनपा कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे वेतन रखडले
मागील एक- दीड वर्षापासून मनपा कर्मचाऱ्यांचे पगार नियमित होत नाहीत. त्यामुळे कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणीचा ताण सहन करावा लागत आहे. कोरोनाची स्थिती आणि त्यात वेतन नसल्याने वैद्यकीय खर्च, दररोजचे घरगुती प्रश्न रखडले आहेत. तेव्हा कर्मचाऱ्यांचे वेतन तत्काळ अदा न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा महानगरपालिका सफाई कामगार व कर्मचारी संघटनेने आयुक्तांना दिला आहे.
इतरही मागण्यांचा पाठपुरावा
रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम करावे, सातवा वेतन आयोग लागू करावा, १२ व २४ वर्षांची पदोन्नती तत्काळ द्यावी, कोरोनाकाळात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना महानगरपालिकेतर्फे ५० लाख रुपयांचा विमा काढण्यात यावा, कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्यास उपचारासाठी एक लाख रुपयांची अग्रीम रक्कम द्यावी, सफाई कामगार संदीप सूर्यवंशी यांना कामावर घ्यावे, रोजंदारी कर्मचाऱ्यांची कपात केलेली रक्कम परत करावी आदी मागण्या कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष अनुसयाबाई जोगदंड आणि सचिव .के. .के. भारसाकळे यांनी केल्या आहेत.