घरास कुलूप असल्याचा फायदा घेत केली पावणे दोन लाखांची चोरी, सोन्यासह रोकड लंपास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 13:22 IST2017-08-25T13:22:19+5:302017-08-25T13:22:29+5:30

यशोधन नगर भागातील एका शिक्षिकेचे घरात पावणे दोन लाखाची घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. यात साडेपाच तोळे सोन्याच्या दागिण्यांसह १० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 

Two lakhs of theft, gold and cash and Lampas have been able to take advantage of locking the house | घरास कुलूप असल्याचा फायदा घेत केली पावणे दोन लाखांची चोरी, सोन्यासह रोकड लंपास 

घरास कुलूप असल्याचा फायदा घेत केली पावणे दोन लाखांची चोरी, सोन्यासह रोकड लंपास 

परभणी, दि. २५ : यशोधन नगर भागातील एका शिक्षिकेचे घरात पावणे दोन लाखाची घरफोडी झाल्याचे उघडकीस आले आहे. यात साडेपाच तोळे सोन्याच्या दागिण्यांसह १० हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. 

आशा देशमुख या शिक्षिका असून त्या यशोधन नगर येथे राहतात, गुरवारी (दि. २४) देशमुख या घराला कुलूप लावून नातेवाईकांकडे गेल्या होत्या. याचाच फायदा घेत चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यानंतर त्यांनी आतील खोलीतील कपाटात ठेवलेले साडेपाच तोळे सोन्याचे दागिने व १० हजार रुपयांची रक्कम घेऊन पोबारा केला. ही बाब आज सकाळी उघडकीस आल्यास नवामोंढा पोलिसांना तातडीने माहिती देण्यात आली.  माहिती मिळताच पोलीस निरीक्षक व्ही.डी.श्रीमनवार घटनास्थळी दाखल झाले. यासोबतच श्वान पथकास पाचारण करण्यात आले. श्वान कल्याणमंडपम् परिसरापर्यंत जाऊन घुटमळले. घटनास्थळी ठसे तज्ञानांही पाचावण करण्यात आले असून पोलीस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: Two lakhs of theft, gold and cash and Lampas have been able to take advantage of locking the house