एकाच व्यक्तीचे एकाच दिवशी दोन वेगवेगळे अहवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:26+5:302021-05-13T04:17:26+5:30
परभणी : कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी खासगी प्रयोगशाळेमध्ये दिलेल्या एकाच नमुन्याचे एकाच दिवशी दोन वेगवेगळे अहवाल दिल्याची तक्रार संबंधित ...

एकाच व्यक्तीचे एकाच दिवशी दोन वेगवेगळे अहवाल
परभणी : कोरोना संसर्गाची तपासणी करण्यासाठी खासगी प्रयोगशाळेमध्ये दिलेल्या एकाच नमुन्याचे एकाच दिवशी दोन वेगवेगळे अहवाल दिल्याची तक्रार संबंधित नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
तालुक्यातील आसोला येथील एका नागरिकाने ९ मे रोजी शहरातील खासगी प्रयोगशाळेत आरटीपीसीआर तपासणी केली. या प्रयोगशाळेतून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.३० च्या सुमारास या नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह देण्यात आला. मात्र त्याच दिवशी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास त्यांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचा एसएमएस मोबाईलवर पाठविण्यात आला. एकाच व्यक्तीचे दोन वेगवेगळे अहवाल प्राप्त झाल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. असोला येथीलच अन्य एका व्यक्तीने २६ एप्रिल रोजी खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली होती. तेव्हा त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला तर शासकीय रुग्णालयात केलेल्या तपासणीत हा अहवाल निगेटिव्ह आला आहे. केवळ तीन दिवसांच्या फरकाने दोन वेगवेगळे अहवाल त्यांना प्राप्त झाले आहेत. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.